एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पिच क्युरेटरचं स्टिंग, कोण आहेत पांडुरंग साळगावकर?
पांडुरंग साळगावकर हे माजी रणजीपटू आहेत. 1971-72 ते 1981-82 या कालावधीत महाराष्ट्रासाठी त्यांनी रणजी सामने खेळले.
मुंबई/पुणे: पुण्यातील गहुंजे मैदानावर होणारा भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पीच क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांचं धक्कादायक स्टिंग ऑपरेशन 'आज तक' वाहिनीने समोर आणलं आहे. बॅटिंगसाठी चांगलं पीच तयार करण्यासाठी पैशांच्या देवाणघेवाणीचा उल्लेख या स्टिंगमध्ये आहे.
कोण आहेत पांडुरंग साळगावकर?
पांडुरंग साळगावकर हे माजी रणजीपटू आहेत. 1971-72 ते 1981-82 या कालावधीत महाराष्ट्रासाठी त्यांनी रणजी सामने खेळले. साळगावकरांनी जलदगती गोलंदाज म्हणून रणजी सामन्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती.
1971-72 या पदार्पणाच्या रणजी सामन्यांमध्ये साळगावकरांनी 15 विकेट्स घेतल्या होत्या. इराणी कपमध्येही त्यांनी 'रेस्ट ऑफ इंडिया'साठी बॉम्बेविरोधात सामने खेळले आहेत. यावेळी अजित वाडेकरांसह सहा विकेट्स त्यांनी घेतल्या होत्या.
पिच क्युरेटर साळगावकरांचं धक्कादायक स्टिंग, आजचा सामना रद्द होणार?
जानेवारी 1974 मध्ये श्रीलंका दौऱ्यासाठी त्यांची निवड झाली होती. 1974-75 मध्ये दलिप ट्रॉफीच्या उपान्त्य सामन्यात इस्ट झोनचा त्यांनी धुव्वा उडवला. 1974-75 नंतर ते फक्त महाराष्ट्रासाठी रणजी खेळले. 1980-81 मध्ये बडोद्याविरुद्ध त्यांनी ठोकलेलं शतक हे त्यांच्या कारकीर्दीचं हायलाईट म्हणता येईल. निवृत्तीनंतर साळगावकर पुण्यात क्रिकेट कोचिंग अकादमी चालवतात. सध्या ते पुण्यातील 'महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन क्रिकेट स्टेडियम'चे मुख्य पीच क्युरेटर आहेत. महाराष्ट्र रणजी टीमचे मुख्य निवडकर्ते म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. बीसीसीआयनं या वृत्ताची गांभीर्यानं दखल घेऊन चौकशी करण्याची घोषणा केली आहे. तसंच दोषीवर कारवाई करु असंही म्हटलंय. दरम्यान पांडुरंग साळगावकरांच्या स्टिंगमुळे आज होणारी मॅचही रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्याचं पिच कसं आहे? पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमचं पिच फिरकी गोलंदाजांसाठी चांगलं समजलं जातं. इथे गोलंदाजांना मदत मिळते. मागच्या वेळी इथे झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलियामधील कसोटी सामन्यात फिरकीपटूंचा दबदबा पाहायला मिळाला होता. मात्र पुण्याचं पिचवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात बॉल जेवढा वळत होता, तेवढा आता वळणार नाही. नाणेफेक जिंकल्यानंतर कोणताही संघ पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेईल, कारण संध्याकाळी दव पडतं, त्यावर सामन्याचा निकाल ठरु शकतो. पुण्यात MCA स्टेडियमवर आतापर्यंत दोन सामने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये आतापर्यंत टीम इंडियाने दोन वन डे सामने खेळले आहेत. यापैकी एका सामन्यात टीम इंडिया विजयी झाली आहे, तर एका सामन्यात पराभूत. 2013 साली खेळलेल्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 72 धावांनी पराभूत केले होते. तर यंदा जानेवारी महिन्यात इंग्लंड विरोधातील सामन्यात भारताने 3 विकेट्सने विजय मिळवला होता.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement