एक्स्प्लोर
प्रो कबड्डी लीग: पटना पायरेट्सला विजेतेपद, फायनलमध्ये जयपूरवर मात
मुंबई : पटना पायरेट्सनं जयपूर पिंक पँथर्सचा 37-29 असा पराभव करून सलग दुसऱ्यांदा प्रो कबड्डी लीगच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. उभय संघांमधला हा सामना पूर्वार्धात खूपच चुरशीचा झाला.
उत्तरार्धात पटना पायरेट्सनं सामन्यावर वर्चस्व गाजवून विजेतेपद पटकावलं. पटना पायरेट्सच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो प्रदीप नरवाल. त्यानं आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करून चढाईत 16 गुणांची वसुली केली.
https://twitter.com/ProKabaddi/status/759797188448907264
जयपूर पिंक पँथर्सकडून कर्णधार जसवीरसिंग आणि राजेश नरवाल यांनी प्रयत्नांची शर्थ केली. पण आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात त्यांना अपयश आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
रायगड
जळगाव
Advertisement