एक्स्प्लोर

नितीन तोमर प्रो कबड्डी लीगचा सर्वात महागडा खेळाडू!

मुंबई : प्रो कबड्डी लीगच्या पाचव्या मोसमाच्या लिलावात 22 वर्षीय नितीन तोमर सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. आगामी मोसमासाठी नवखा संघ असलेल्या टीम यूपीने त्याला 93 लाखांमध्ये खरेदी केलं. पीकेएलच्या यंदाच्या मोसमात 12 संघ आहेत. पाचव्या मोसमात हरियाणा, यूपी, अहमदाबाद आणि तामिळनाडू या चार नव्या संघाचा समावेश करण्यात आला आहे. व्हीवो या लीगचा टायटल स्पॉन्सर असून या लीगला पुढील पाच वर्षांसाठी 300 कोटी रुपये देणार आहे. 22 वर्षांचा नितीन तोमर सर्वात महागडा लिलावाच्या सुरुवातीला मनजीत चिल्लर सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. जयपूर पिंक पँथर्सने त्याला 75.5 लाखंमध्ये खरेदी केलं. पण लिलावाच्या अखेरच्या टप्प्यात जेव्हा रेडरसाठी लिलाव सुरु झाला, तेव्हा नितीन तोमरने सर्व रेकॉर्ड मोडले आणि मनजीत चिल्लरला धोबीपछाड जेत सर्वात महागडा खेळाडू बनला. यानंतर रोहित कुमारनेही मनजीतला मागेल टाकलं. बंगळुरु बुल्सने 83 लाखांमध्ये आपल्या संघात सामील केलं. के सेल्वामणीही मनजीतजवळ पोहोचला होता. पण जयपूरने त्याच्या 73 लाखांची अंतिम बोली लागली. परदेशी खेळाडूंमध्ये इराणचा मिघानी महागडा पहिल्या टप्प्यात परदेश खेळाडूंमध्ये इराणचा अबाजार मोहाजेरमिघानी सर्वात महागडा खेळाडू ठरला. इराणच्या या डिफेंडरला, प्रो कबड्डी लीगच्या पाचव्या सीझनमध्ये नव्याने दाखल झालेल्या गुजरातच्या संघाने 50 लाखांमध्ये विकत घेतलं. अष्टपैलू, डिफेंडर, रेडरला किती बोली? खेळाडूंना 20 लाख रुपयांपासून 93 लाख रुपयांपर्यंतची बोली लागली. अष्टपैलू श्रेणीमध्ये मनजीत चिल्लरनंतर राजेश नरवाल सर्वात महागडा खेळाडू ठरला. यूपी टीमने 69 लाख रुपये मोजून राजेश नरवालला आपल्या संघात समाविष्ट केलं. डिफेंडर खेळाडूंमध्ये सूरजीत सिंहला बंगालच्या संघाने 73 लाखांमध्ये आपल्या संघात सामील केलं. तर जीव कुमार 52 लाखंसह दुसरा सर्वात महागडा डिफेंडर बनला. यूपी संघाने त्याच्यावर यशस्वी बोली लावली. रेडरमध्ये नितीन तोमर सर्वात महागडा खेळाडू बनला. तर या श्रेणीत रोहित कुमार 81 लाख रुपयांसह दुसऱ्या स्थानावर राहिला. यंदाच्या मोसमात रोहित कुमार बंगळुरु टीमचं प्रतिनिधित्त्व करेल. दुसरीकडे शब्बीर बापूची घरवापसी झाली आहे. यू मुंबाने 45 लाखांत शब्बीर बापूला पुन्हा संघात सामील करुन घेतलं.  तर अनुप कुमारच्या जोडीला काशीलिंग अडके आणि नितीन मदने हे दोन मराठमोळे शिलेदार असतील. याशिवाय मुंबईच्या रिषांक देवाडिगाला टीम उत्तरप्रदेशने 45.50 लाखात खरेदी केलं आहे. दिल्लीचे तख्त राखायला खंदे मराठमोळे वीर मैदानात उतरले आहे. निलेश शिंदे आणि बाजीराव होडगे दिल्लीच्या संघात सामील झाले आहेत.

कोण कोणत्या संघात?

बंगाल वॉरियर्स जान कुंग ली - 80.3 लाख रणसिंह - 47.50 लाख सूरजीत सिंह - 73 लाख विरेंद्र सिंह - 12 लाख www.abpmajha.in बंगळुरु बुल्स आशिष कुमार - रिटेन रविंदर पहल - 50 अजय कुमार- 48.5 लाख रोहित कुमार - 81 लाख www.abpmajha.in दबंग दिल्ली मेराज शेख - रिटेन अबलोफजल - 31.8 लाख निलेश शिंद - 35.50 लाख रवी दलाल - 20 लाख बाजीराव होडगे - 44.50 लाख अबु फजल - 31.8 लाख सुरज देसाई - 52.50 लाख www.abpmajha.in जयपूर पिंक पँथर मनजीत चिल्लर - 75.50 लाख जसवीर सिंह - 51 लाख सेल्वामणी - 73 लाख www.abpmajha.in पटना पायरेट्स प्रदीप नरवाल - रिटेन मोहम्मद मगसोदलोउ - 8 लाख विशाल माने - 36.50 लाख सचिन शिंगाडे - 42.50 लाख मनू गोयत - 44.50 लाख जयदीप सिंह - 50 लाख मनिष - 50 लाख नवनीत गौतम - 24 लाख www.abpmajha.in पुणेरी पलटन दीपक हुडा - रिटेन झियाऊर रहमान - 16.6 लाख संदीप नरवाल - 66 लाख गिरीश एर्नाक - 33.50 लाख धर्मराज चेरालाथन - 46 लाख राजेश मोंडाल - 42 लाख ताकामित्सु कोनो - 8 लाख www.abpmajha.in तेलुगू टायटन्स राहुल चौधरी - रिटेन फरहाद राहिमी - 29 लाख राकेश कुमार - 45 लाख रोहित राणा - 27.50 लाख अमित सिंह चिल्लर - 16.60 लाख www.abpmajha.in यू मुंबा अनुप कुमार - रिटेन डोंगजू होंग - 20 लाख हादी ओश्तोरोक - 18.6 लाख युंग जुओ - 8.10 लाख कुलदीप सिंह - 51.50 लाख जोगिंदर नरवाल - 32 लाख काशीलिंग अडके - 48 लाख नितीन मदने - 8.50 लाख शब्बीर बापू - 45 लाख www.abpmajha.in टीम गुजरात फजल अत्राचली - Priority Pick अबुझार मोहरर्मघानी - 50 लाख सुकेश हेगडे - 31.50 लाख विकास काळे - 12.60 लाख मनोज कुमार - 21 लाख सुरेश हेगडे - गुजरात - 31.5 लाख www.abpmajha.in टीम हरियाणा सुरेंदर नाडा - Priority Pick खोमसाम थोंगकम - 20.4 लाख मोहित चिल्लर - 46.50 लाख सोनू नरवाल - 21 लाख सूरजीत सिंह - 42.50 लाख महेंद्र सिंह - 12.80 लाख www.abpmajha.in टीम तामिळनाडू अजय ठाकूर - Priority Pick अनिल कुमार - 25.50 लाख अमित हुडा - 63 लाख संकेत चव्हाण - 12 लाख टी. प्रभाकरन - 12 लाख www.abpmajha.in टीम उत्तरप्रदेश नितीन तोमर - 93 लाख सुलेमान कबीर - 12.6 लाख राजेश नरवाल - 69 लाख जीवा कुमार - 52 लाख रिषांक देवाडिगा - 45.50 लाख गुरविंदर सिंह - 12 लाख www.abpmajha.in
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget