Pro Kabaddi League 2021: भारतातील लोकप्रिय लीग पीकेएलला (Pro Kabaddi League 2021) 22 डिसेंबरपासून सुरुवात झालीय. प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामात शुक्रवारी 3 सामने होणार आहेत. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात बंगळुरूचा पराभव करणारा मुंबईचा संघ आज दिल्लीशी  (U Mumba Vs Dabang Delhi KC) भिडणार आहे. तर, बंगाल विरुद्ध गुजरात  (Bengal Warriors Vs Gujarat Giants) आणि तामिळनाडू विरुद्ध बंगळरू यांच्यातही (Tamil Thalaivas Vs Bengaluru Bulls)  आज सामना रंगणार आहे. 


दरम्यान, मुंबई आणि दिल्ली यांच्यातील सामन्याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. या दोन्ही संघानं त्यांच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवलाय. मुंबईनं बंगळुरूचा आणि दिल्लीनं पुण्याचा पराभव केलाय. यामुळं दोन्ही संघ दुसऱ्या विजयासाठी मैदानात उतरणार आहेत. त्यानंतर बंगाल आणि गुजरात यांच्यात दुसरा सामना रंगणार आहे. या दोन्ही संघानी पहिला सामना जिंकून स्पर्धेची दमदार सुरुवात केलीय. तर, आजची तिसरी लढत तामिळनाडू विरुद्ध बंगळुरू यांच्यात रंगणार आहे. पहिला सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. त्यानंतर दुसरा सामना रात्री 8.30 वाजता सुरू होईल. तर, तिसरा आणि शेवटचा सामना रात्री 9.30 वाजता खेळला जाणार आहे.


कधी आणि कुठे पाहता येणार सामने? 
भारतामध्ये या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण 'स्टार स्पोर्ट्स नेटवर्क' वर पाहता येणार आहे. तर, डिस्नी+हॉटस्टार ऍप आणि वेबसाईट कबड्डी मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे.


पीकेएलचे आतापर्यंत सात हंगाम पार पडले आहेत. ज्यात पीकेएलचे सर्वाधिक किताब पाटणा पायरेट्सनं पटकावले आहे. पाटणा पायरेट्सनं तीनदा विजेतेपद पटकावलंय. या स्पर्धेत पाटणा व्यतिरिक्त कोणत्याही संघाला दोनदा विजतेपद मिळवता आलं नाही. जयपूर पिंक पँथर्स, यू मुंबा, बेंगळुरू बुल्स आणि बंगाल वॉरियर्स यांनी प्रत्येकी एकदा विजेतेपद पटकावलंय. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha