Pro Kabaddi League 2021 : आज झालेल्या प्रो कबड्डीच्या तिसऱ्या सामन्यात पाटना पायरेट्स संघाने (Patna Pirates)  सनसनाटी विजय मिळवला आहे. अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात पाटना पायरेट्स संघाने हरियाणा स्टीलर्स (Haryana Steelars)  संघाचा 42-39 च्या फरकाने पराभव केला. अखेरच्या क्षणी दोन्ही संघाने 37-37 अशी बरोबरी केली होती. मात्र, पाटना संघाने आपला खेळ उंचावत विजय हिरावून आणला. बंगळुरुच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात दोन्ही संघाने दमदार खेळाचं प्रदर्शन घडवलं. चाहत्यांनी कबड्डीचा रोमांच अनुभवला. बलाढ्या पाटना संघाला हरियाणा स्टीलर्सचा तगडी टक्कर देत सामना रोमांचक केला.  


रोमांचक सामन्यात हरियाणा स्टीलर्स संघाचा पराभव करत पाटना पायरेट्स संघाने (Pro Kabaddi League, PKL) यंदाच्या हंगामाची विजयी सुरुवात केली. रायडर मोनू गोयत (Monu Goyat) ने 15 गुण घेत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.  हरियाणा स्टीलर्सने पहिल्या हाफनंतर 22-18 ने आघाडी घेतली होती. हरियाणा स्टीलर्सने दमदार कामगिरी करत पाटना पायरेट्सवर वर्चस्व गाजवलं होतं. पटना संघ ऑल आऊट होण्याच्या जवळ पोहचला होता. पण त्याचवेळी सचिनने कारनामा केली. मोक्याच्या क्षणी सचिनने दोन गुण घेत संघाला ऑलआऊट होण्यापासून वाचवलं. पाटनासाठी कर्मधार प्रशांत कुमार राय याने महत्वाचे गुण घेतले. पहिल्या आणि दुसऱ्या हाफमध्ये क्षणाक्षणाला दोन्ही संघाकडे सामना फिरत होता. दोन्ही संघांनी दमदार खेळाचं प्रदर्शन घडवलं. कधी पाटना तर कधी हरियाणा ... असे दोन्ही संघाने आघाडी घेण्याचा प्रयत्न केला. पण अखेरपर्यंत कोणत्याच संघाला आघाडी घेता आली नाही. अखेरच्या क्षणी दोन्ही संघाचे 37-37 गुण झाले होते. त्यावेळी पाटना संघाने आपला खेळ उंचावत आपले गुण 42 केले. तर हरियाणा संघ 39 गुणांपर्यंत मजल मारु शकला. रोमांचक सामन्यात हरियाणा संघाचा दोन तीन गुणांनी पराभव झाला.  






संबधित बातम्या :


Pro Kabaddi League : अभिषेक बच्चनच्या जयपुर पिंक पँथर्सला पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का, गुजरात जायंट्सची बाजी 
Pro Kabaddi League : रोमाचंक सामन्यात दबंग दिल्लीची पुणेरी पलटणवर मात
Pro Kabaddi League : अक्षय कुमार, अल्लू अर्जुनपासून सचिन तेंडुलकरपर्यंत 'हे' आहेत प्रो कबड्डी संघाचे मालक, पाहा यादी