Pro Kabaddi League 2021 :  बॉलीवुड अभिनेता अभिषेक बच्चन आणि जीएस एंटरटेनमेंट या दोघांकडे या संघाचे मालकि हक्क असलेल्या जयपुर पिंक पँथर्सला (Jaipur Pink Panthers)  यंदाच्या हंगामातील पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुजरात जायंट्सने जयपुर पिंक पँथर्सचा 34-27 च्या फरकाने पराभव केलाय. जयपुर पिंक पँथर्सची  आठव्या हंगामाची सुरुवात निराशाजनक झाली. बंगळुरुमध्ये झालेल्या सामन्यात गुजरात संघाकडून रायडर राकेश नरवाल आणि डिफेंडर गिरीश मारुती यांनी प्रत्येकी सात-सात गुण घेत जयपूर संघाला बॅकफूटवर ढकललं.  ऑलराउंडर राकेशला सहा गुण मिळाले. जयपुर पँथर्ससाठी रायडर अर्जुन देशवाल याने सर्वाधिक 10 गुण मिळवले, मात्र संघाचा पराभव रोखू शकला नाही.  


दोन्ही संघानं दमदार खेळाचं प्रदर्शन घडवलं. पण गुजरात जायंट्स संघाने सांघिक कामगिरीच्या जोरावर जयपुर पिंक पँथर्सचा पराभव केला. पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघामध्ये तुल्यबळ लढत पाहायला मिळाली. दिपक हुड्डाच्या नेतृत्वातील जयपुर पिंक पँथर्सने पहिल्या हाफमध्ये 17 गुण मिळवले होते. तर गुजरात जायंट्स संघाने 19 गुण मिळवले होते. गुजरात संघाने रेडच्या मार्फत आठ, टॅकलमाऱ्पत 2 , ऑलआऊट दोन आणि इतर माध्यमातून दोन गुणांची कमाई केली. जयपुर पिंक पँथर्सने पहिल्या हाफमध्ये रेडच्या मार्फत 11, टॅकलमार्फत 3, ऑलआऊटच्या मार्फत दोन आणि एक अतिरिक्त गुण मिळवला होता.  


पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघानं एकमेंकाना जोरदार प्रत्युत्तर दिलं. पण दुसऱ्या हाफमध्ये गुजरात जायंट्स संघानं आपला खेळ आणखी उंचवला. दुसऱ्या हाफमध्ये गुजरात संघाने सांघिक खेळाचं प्रदर्शन घडवलं. दुसऱ्या हाफमध्ये गुजरात संघाने जयपुर संघाला वरचढ होण्याची कोणतीही संधी दिली नाही. दुसऱ्या हाफमध्ये गुजरात संघाने दमदार खेळ दाखवत 15 गुण मिळवले. यावेळी जयपुर पिंक पँथर्स संघाला फक्त 10 गुणांवर समाधान मानावं लागलं. अखेरच्या ङापमध्ये गुजरात संघाला रेड आणि टॅकलमार्फत प्रत्येकी 6-6 गुण मिळाले. तर ऑलआऊटच्या मार्फत दोन आणि एक अतिरिक्त गुण मिळाला. तर जयपुर पिंक पँथर्स संघाला  दुसऱ्या हाफमध्ये रेडच्या मार्फत 5, टॅकलमधून चार आणि अतिरिक्त एक गुण मिळाला.