एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pro Kabaddi League 2018: दिल्लीला धूळ चारत यू मुम्बा अव्वल स्थानावर
यू मुम्बाने शनिवारी झालेल्या सामन्यात दबंग दिल्लीचा 39-23 असा धुव्वा उडवून अ गटात पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे.
मुंबई : प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वात यू मुम्बाने शनिवारी झालेल्या सामन्यात दबंग दिल्लीचा 39-23 असा धुव्वा उडवून अ गटात पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. पुण्याच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात हा सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात यू मुम्बाच्या रेडर आणि डिफेंडर्सच्या अष्टपैलू खेळामुळे यू मुम्बाने विजय मिळवला.
कालच्या दिल्लीविरुद्धच्या सामन्यात पहिल्या सत्रापासून यू मुम्बाने आपले वर्चस्व कायम ठेवले होते. पहिल्या सत्रात यू मुम्बा 15-8 ने पुढे होती. या दरम्यान सिद्धार्थ देसाई आणि रोहित बालियान यांच्या आक्रमक रेडींगने दबंग दिल्लीच्या डिफेंडर्सचे कंबरडे मोडले. मुंबईच्या आक्रमणामुळे दिल्लीचा संघ संपूर्ण सामन्यात दबावाखाली खेळत होता. त्यामुळे त्यांना या सामन्यात पुनरागमन करता आले नाही.
दुसऱ्या बाजूने यू मुम्बाच्या डिफेंडर्सनेदेखील जोरदार खेळ केला. सुरिंदर सिंह, फजल अत्राचली, रोहित राणा यांनीही संघाची आघाडी कायम राखण्यात महत्वाची भूमिका बजावली.
या लीग मध्ये 16 सामन्यांमध्ये यू मुम्बा ने 11 सामन्यात बाजी मारली आहे. तसेच 62 पॉइंटसह यू मुम्बा अ गटात पहिल्या स्थानावर जाउन पोहचली आहे. दबंग दिल्लीने लीगमध्ये खेळलेल्या 12 सामन्यांमधील 6 सामन्यांमध्ये पराभव पत्कारावा लागला आहे. काल झालेल्या सामन्यात यू मुम्बाच्या सिद्धार्थ देसाई, रोहित बालियान या दोघांनी प्रत्येकी आठ पॉइंट तर सुरेंद्र सिंह, अभिषेक सिंह आणि फजल अत्राचली यांनी प्रत्येकी चार-चार पॉइंट्स मिळवले.
Leading with 16 points, Mumboys have won today’s match.#MeMumba #UMumba #Mumboys #VivoProkabaddi #MUMvDEL pic.twitter.com/X4uWLXNIJa
— U Mumba (@U_Mumba) November 24, 2018
Last night our #Mumboys put up a solid show against Dabang Delhi K.C. from the very beginning. Catch some moments of the match here!#MeMumba #UMumba #Mumboys #VivoProkabaddi #MUMvDEL pic.twitter.com/GfWyi2Tuo1
— U Mumba (@U_Mumba) November 25, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
मुंबई
निवडणूक
निवडणूक
Advertisement