एक्स्प्लोर
Advertisement
पृथ्वी शॉच्या मॅनेजमेंट टीमकडून स्विगी, फ्रीचार्जकडे 1 कोटींची मागणी
पृथ्वी शॉचं नाव वापरुन जाहिरात केल्याप्रकरणी 'बेसलाईन वेंचर्स'ने काही कंपन्यांना नोटीस बजावली आहे.
मुंबई : पदार्पणातच विक्रम रचणारा टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज पृथ्वी शॉच्या टीम मॅनेजमेंटने स्विगी, फ्रीचार्ज यासारख्या प्रसिद्ध कंपन्यांकडे एक कोटी रुपयांची मागणी केली आहे. पृथ्वी शॉचं नाव वापरुन जाहिरात केल्याप्रकरणी 'बेसलाईन वेंचर्स'ने काही कंपन्यांना नोटीस बजावली आहे.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी सामन्यात पदार्पणातच शतक ठोकत पृथ्वी शॉने विक्रम रचला. त्यानंतर पृथ्वीवर सोशल मीडियावरुन अभिनंदनाचा वर्षाव झाला. क्रीडा क्षेत्रासोबतच कलाकार, राजकीय नेते आणि मोठमोठ्या कंपन्यांनीही त्याला शुभेच्छा दिल्या. मात्र 'बिझनेस टूडे'च्या रिपोर्टनुसार पृथ्वी शॉचं मार्केटिंग सांभाळणाऱ्या 'बेसलाईन वेंचर्स'ने स्विगी, फ्रीचार्ज सारख्या कंपन्यांना नोटीस बजावली आहे.
पृथ्वी शॉचं नाव वापरुन जाहिरात केल्याबद्दल एक कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. सोशल मीडियावरील या मेसेजेसमुळे ट्रेडमार्क कायदा 1996 अंतर्गत बेसलाईन वेंचर्सच्या विशेष हक्कांचं उल्लंघन होत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
स्विगीने आपल्या जाहिरातीचं ट्वीट डिलीट केलं आहे. 'पहिल्या गोष्टी कायम स्मरणात राहतात. रसमलाईचा पहिला घास आणि पृथ्वी शॉची पहिली खेळी' अशी स्विगीची जाहिरात होती.
'अमूल' कंपनीनेही पृथ्वी शॉचं नाव वापरुन जाहिरात केली होती. 'शॉ'बास... अमूल- पृथ्वीका फेवरेट मख्खन' असं अमूल गर्लच्या पाठीमागे पृथ्वी शॉ दाखवून लिहिलं होतं.
मुंबईच्या पृथ्वी शॉने राजकोट कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खणखणीत शतकी पदार्पण केलं. पृथ्वी शॉ हा पदार्पणाच्या कसोटीत शतक ठोकणारा जगातील चौथा सर्वात युवा क्रिकेटपटू ठरला आहे.
पृथ्वी शॉचं वय हे 18 वर्षे 329 दिवस आहे. 9 नोव्हेंबर 1999 रोजी जन्मलेला पृथ्वी शॉ हा पदार्पणाच्या कसोटीत शतक ठोकणारा भारताचा सर्वात युवा क्रिकेटपटू ठरला आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पदार्पणात शतक ठोकणारा पृथ्वी शॉ हा पंधरावा भारतीय फलंदाज ठरला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
लातूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement