एक्स्प्लोर
Advertisement
तिसऱ्या वनडेत प्रेक्षकांचा गोंधळ, खेळ थांबवण्याची नामुष्की
प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळं या सामन्यात पंचांनी टीम इंडियाला आठ धावा आधीच विजय बहाल केला. मात्र काही वेळानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करण्यात आली.
कॅण्डी : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या वन डेत प्रेक्षकांचा अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. भारताला विजयासाठी केवळ 8 धावांची आवश्यकता असताना प्रेक्षकांनी मैदानात बाटल्या फेकल्या. ज्यामुळे खेळ थांबवावा लागला.
काही काळानंतर मैदानाचा एक भाग खाली करण्यात आला. त्यानंतर खेळाडूंना पुन्हा मैदानात बोलावण्यात आलं. दरम्यान या गोंधळाप्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
विराट कोहलीच्या टीम इंडियाने कॅण्डीच्या तिसऱ्या वन डेत श्रीलंकेचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवून, श्रीलंका दौऱ्यातल्या पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली. जसप्रीत बुमराने पाच विकेट्स घेऊन, तर रोहित शर्माने नाबाद शतक ठोकून भारताच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली.
या सामन्यात टीम इंडियासमोर विजयासाठी अवघं 218 धावांचं आव्हान होतं. पण श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भारताची चार बाद 61 अशी अवस्था करून सामन्यात रंग भरला. त्या परिस्थितीत रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनीने पाचव्या विकेटसाठी 139 धावांची अभेद्य भागीदारी रचून टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळं या सामन्यात पंचांनी टीम इंडियाला आठ धावा आधीच विजय बहाल केला. मात्र काही वेळानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement