PBKS vs MI, 1st Innings Score: पंजाबसमोर मुंबईचं 132 धावांचं आव्हान, रोहित शर्माचं अर्धशतक
PBKS vs MI, IPL 2021 1st Innings Highlights:चेन्नईत सुरु असलेल्या आयपीएल सामन्यात पंजाबसमोर मुंबईनं 132 धावांचं आव्हान ठेवलं आहे. रोहित शर्माचं अर्धशतक आणि सूर्यकुमारच्या उपयुक्त खेळीच्या बळावर मुंबईनं 6 विकेट्स गमावत 131 धावा केल्या.
PBKS vs MI, IPL 2021 1st Innings Highlights: चेन्नईत सुरु असलेल्या आयपीएल सामन्यात पंजाबसमोर मुंबईनं 132 धावांचं आव्हान ठेवलं आहे. रोहित शर्माचं अर्धशतक आणि सूर्यकुमारच्या उपयुक्त खेळीच्या बळावर मुंबईनं 6 विकेट्स गमावत 131 धावा केल्या.
फलंदाजांची फ्लॉप कामगिरी पुन्हा एकदा मुंबईसाठी डोकेदुखी ठरली आहे. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव वगळता कुणालाही चांगली खेळी करता आली नाही. मुंबईने पहिल्या 6 षटकांच्या पॉवरप्लेमध्ये सर्वात कमी धावा करण्याचा लाजिरवाणा विक्रम नोंदवला. पहिल्या 6 षटकांच्या पॉवरप्लेमध्ये मुंबईने फक्त 21 धावा केल्या. सुरुवातीला मुंबईचा सलामीवीर क्विंटन डि कॉकला केवळ तीन धावा करुन बाद झाला. पॉवरप्लेनंतर ईशान किशनही बाद झाला. त्यानं 17 चेंडूत केवळ सहा धावा केल्या.
ईशान किशन बाद झाल्यानंतर आलेल्या सूर्यकुमारला सोबत घेऊन रोहित शर्मानं डाव सावरला. 17व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात सूर्यकुमार यादव ख्रिस गेलकडे झेल देऊन बाद झाला. सूर्यकुमारने 3 चौकार आणि एका षटकारासह 33 धावा केल्या. त्यानंतर मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा बाद झाला. रोहितने 5 चौकार आणि 2 षटकारांसह 63 धावा केल्या.
हार्दिक पंड्या या सामन्यातही अपयशी ठरला. हार्दिकला केवळ 1 धावेवर अर्शदीपने बाद केले. शेवटच्या षटकात अर्शदीपच्या गोलंदाजीवर कृणाल पंड्या 3 धावांवर बाद झाला. पोलार्डनं एका षटकाराच्या मदतीनं नाबाद 16 धावा केल्या.
पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात 26 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी मुंबईने 14 वेळा, तर पंजाब 12 सामने जिंकले आहेत. पंजाबनं यंदाच्या आयपीएलमध्ये चारपैकी केवळ एक सामना जिंकला आहे. तर दुसरीकडे मुंबईने 4 पैकी 2 सामने जिंकले आहेत.