(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PBKS vs CSK, IPL 2021: चेन्नईचा पंजाबवर सहा विकेट्सने विजय, चेन्नईची गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप
CSK vs PBKS , IPL 2021 Highlights: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या पंजाब विरुद्ध चेन्नईतील सामन्यात चेन्नईनं पंजाबला सहा विकेट्स राखून हरवलं. या विजयासह चेन्नईनं गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
CSK vs PBKS , IPL 2021 Highlights: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या पंजाब विरुद्ध चेन्नईतील सामन्यात चेन्नईनं पंजाबला सहा विकेट्स राखून हरवलं. या विजयासह चेन्नईनं गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. सलग तिसऱ्यांदा आयपीएलमध्ये पंजाबला चेन्नईविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.
पंजाबच्या 107 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नईची सुरुवात खराब झाली. अर्शदीप सिंगने सलामीवीर ऋतुराज गायकवाडला 5 धावांवर बाद करत पहिला धक्का दिला. त्यानंतर फाफ डु प्लेसिस आणि मोईन अलीने संयमी खेळी करत संघाला विजयाच्या जवळ नेले. मुरुगन अश्विनने अलीला 46 धावांवर बाद केले. अलीने 7 चौकार आणि एका षटकारासह 46 धावा केल्या. विजयाला 8 धावा असताना मोहम्मद शामीने सुरेश रैना आणि अंबाती रायुडूला बाद लागोपाठ बाद केले. धक्के दिले. त्यानंतर डुप्लेसिसने सॅम करनसोबत विजयावर शिक्कामोर्तब केले. डु प्लेसिस 36 धावांवर नाबाद राहिला.
पंजाबला चेन्नईनं अवघ्या 106 धावांमध्ये रोखलं
त्याआधी प्रथम फलंदाजी करताना पंजाबला चेन्नईनं अवघ्या 106 धावांमध्ये रोखलं. दीपक चहरच्या शानदार गोलंदाजीपुढं पंजाबच्या फलंदाजांनी अक्षरश: नांग्या टाकल्या. पंजाबनं शाहरुख खानच्या 47 धावांच्या बळावर कशीबशी शंभरी पार केली. दीपक चहरने टाकलेल्या पहिल्याच षटकात मयांकला बाद केलं. त्याला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर तिसऱ्या षटकात कर्णधार राहुलला धावबाद झाला. दीपकने पुन्हा ख्रिस गेल (10) आणि निकोलस पूरनला (0) एकापाठोपाठ बाद करत पंजाबचं कंबरडं मोडलं. त्यानंतर दीपक हुडाला 10 धावांवर बाद करत दीपक चहरने चौथी विकेट घेतली. दीपके शानदार गोलंदाजी करत 4 षटकात केवळ 13 धावा देत 4 बळी टिपले.यानंतर झाय रिचर्ड्सननं 15 करत शाहरुख खानला साथ दिली. मोईन अलीने रिचर्ड्सनला (15) बाद करत त्यांची 31 धावांची भागीदारी मोडली. एका बाजूने शाहरुख खानने आपली आक्रमक फटकेबाजी सुरूच ठेवली. शाहरुखने 36 चेंडूत 47 धावा केल्या. त्याने 4 चौकार आणि 2 षटकार लगावले. चेन्नईकडून दीपक चहरने 4 तर ब्राव्हो, मोईन अली, सॅम करननं एक एक विकेट घेतली.