Ajay Jadeja: पाकिस्तानची दाणादाण अफगाणिस्तानने केलीच, पण इंडियन 'गुरुजी' अजय जडेजांचा 27 वर्षातील दुसऱ्यांदा मैदानातील वार वर्मी बसलाय!
1996 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या वर्ल्डकपच्या लढतीत भारताकडून खेळताना जडेजा यांनी पाकिस्तानला धुळ चारली होती. त्यानंतर आता गुरुजी होऊन पाकिस्तानला 2023 मध्ये वर्ल्डकपमध्येच मात दिली आहे.
चेन्नई : अफगाणिस्तानने पाकिस्तानचा 8 विकेटने पराभव करून इतिहास रचला. याआधी अफगाणिस्तानने गतविजेत्या इंग्लंडला हरवून मोठा अपसेट निर्माण केला होता. आता बाबर आझमचा संघ सहज पराभूत झाला. अफगाणिस्तानसमोर 283 धावांचे लक्ष्य होते. अफगाणिस्तानने 49 षटकांत 2 गडी राखून लक्ष्य गाठले. त्याचबरोबर या विजयानंतर अफगाणिस्तान संघाने गुणतालिकेत मोठी झेप घेतली. या सामन्यापूर्वी अफगाणिस्तानचा संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर होता, मात्र आता तो सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजा वर्ल्डकपसाठी मेंटॉर
दुसरीकडे, अफगाणिस्तानने विश्वचषकासाठी संघ व्यवस्थापनात मोठे बदल केले आहेत. अफगाणिस्तानने भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजा यांना वर्ल्डकपसाठी मेंटॉर केलं आहे. जडेजा यांनीही गुरुजी आणि इंडियन म्हणून पाकिस्तानला वर्ल्डकपमध्ये चिरडण्याची परंपरा कायम ठेवत पाकिस्तानला मीठ चोळले.
Ajay Jadeja remains undefeated against Pakistan in the World Cup. pic.twitter.com/ull4ViZz6t
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 23, 2023
इतकंच नाही, तर 1996 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या वर्ल्डकपच्या लढतीत भारताकडून खेळताना जडेजा यांनी पाकिस्तानला धुळ चारली होती. त्यानंतर आता गुरुजी होऊन पाकिस्तानला 2023 मध्ये वर्ल्डकपमध्येच मात दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध हरायचं नाही हा इंडियाचा इतिहास कायम केला.
Afghanistan's dressing room celebrations with Ajay Jadeja's cameo at the end 😛🕺pic.twitter.com/UO7liTPfkV
— CricTracker (@Cricketracker) October 23, 2023
अजय जडेजाची क्रिकेटपटू म्हणून कामगिरी कशी आहे?
अजय जडेजा यांच्या कारकिर्दीवर नजर टाकल्यास त्यांनी भारतासाठी 196 वनडे सामने खेळले. याशिवाय अजय जडेजाने 15 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. अजय जडेजाने 196 एकदिवसीय सामन्यांमध्ये 69.81 च्या स्ट्राइक रेटने आणि 37.22 च्या सरासरीने 5359 धावा केल्या. अजय जडेजा यांनी आपल्या वनडे कारकिर्दीत 6 शतके झळकावली. याशिवाय अजय जडेजा यांनी वनडे फॉरमॅटमध्ये 50 वेळा 50 धावांचा टप्पा ओलांडला. तसेच एकदिवसीय कारकिर्दीत गोलंदाज म्हणून 20 विकेट्स घेतल्या. दरम्यान, या सामन्यांनंतर अफगाण संघाचा सामना अनुक्रमे श्रीलंका, नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.
Mentor Ajay Jadeja enjoying with Afghanistan Cricket Team after beating Pakistan.pic.twitter.com/WrMnBODaHP
— Abhishek Ojha (@vicharabhio) October 23, 2023
तत्पूर्वी, पाकिस्तानच्या 282 धावांना प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तानच्या संघाने फलंदाजी करताना दमदार सुरुवात केली. अफगाणिस्तानचे सलामीवीर रहमानुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांच्यात 130 धावांची भागीदारी झाली. रहमानउल्ला गुरबाज 53 चेंडूत 65 धावा करून शाहीन आफ्रिदीचा बळी ठरला. त्याने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 1 षटकार मारला. तर इब्राहिम झद्रानला हसन अलीने बाद केले. इब्राहिम झद्रानने 113 चेंडूत 87 धावांची शानदार खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 10 चौकार मारले. अफगाणिस्तान संघाला दुसरा धक्का 190 धावांवर बसला.
In 1996 World Cup Ajay Jadeja Defeated Pakistan In Bangalore
— indianhistorypics (@IndiaHistorypic) October 23, 2023
In 2023 World Cup Ajay Jadeja Defeated Pakistan In Chennai pic.twitter.com/rOiCTbR8Qb
यानंतर अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदी आणि रहमत शाह यांनी जबाबदारी स्वीकारली. दोन्ही खेळाडूंमध्ये 96 धावांची भागीदारी झाली. रहमत शाहने 84 चेंडूत 77 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 2 षटकार मारले. अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने 45 चेंडूत 48 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार मारले.
1996 :: Ajay Jadeja Hitting Waqar Younis All Over The Ground During World Cup Quarter Final In Bangalore pic.twitter.com/UzpuowqewQ
— indianhistorypics (@IndiaHistorypic) October 14, 2023
पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी आणि हसन अली यांना प्रत्येकी 1 यश मिळाले. मात्र याशिवाय पाकिस्तानच्या उर्वरित गोलंदाजांनी निराशा केली. हारिस रौफ, उसामा मीर, शादाब खान आणि इफ्तिखार अहमद यांना यश मिळाले नाही. अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांसमोर सहज धावा केल्या.
इतर महत्वाच्या बातम्या