एक्स्प्लोर

464 धावांचं आव्हान असताना भारताची 3 बाद 58 अशी अवस्था

ज्यो रूट आणि अॅलिस्टर कूकने झळकावलेली वैयक्तिक शतकं, तसंच त्या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी रचलेली 259 धावांची भागीदारी यांच्या जोरावर इंग्लंडने ओव्हल कसोटीत आपला दुसरा डाव आठ बाद 423 धावसंख्येवर घोषित केला.

लंडन : ज्यो रूटच्या इंग्लंडने ओव्हल कसोटीत टीम इंडियाला विजयासाठी 464 धावांचं भलंमोठं आव्हान दिलं असून, त्या आव्हानाच्या दडपणाखाली भारताची तीन बाद 58 अशी घसरगुंडी उडाली आहे. जेम्स अँडरसनने शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारा या दोघांना एकाच षटकात पायचीत केलं. मग स्टुअर्ट ब्रॉडने कर्णधार विराट कोहलीला भोपळाही फोडू दिला नाही. त्यामुळे टीम इंडियाची अवस्था तीन बाद दोन अशी केविलवाणी झाली. त्यानंतर लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणेने भारताचा डाव तीन बाद 58 असा सावरून धरला आहे. ज्यो रूट आणि अॅलिस्टर कूकने झळकावलेली वैयक्तिक शतकं, तसंच त्या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी रचलेली 259 धावांची भागीदारी यांच्या जोरावर इंग्लंडने ओव्हल कसोटीत आपला दुसरा डाव आठ बाद 423 धावसंख्येवर घोषित केला. त्यात पहिल्या डावातली 40 धावांची आघाडी जमेस धरून, इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी 464 धावांचं आव्हान दिलं. इंग्लंडच्या डावात रूटने 125 धावांची, तर कूकने 147 धावांची खेळी उभारली. कूकने अखेरच्या कसोटी डावात झळकावलेल्या शतकाचं टीम इंडियाने खिलाडूवृत्तीने कौतुक केलं. तो बाद होऊन माघारी परतत असताना कर्णधार विराट कोहलीने आणि त्याच्या शिलेदारांनी त्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. ओव्हलवर उपस्थित प्रेक्षकांनीही उभं राहून टाळ्यांच्या गजरात कूकला मानवंदना दिली.

महत्त्वाच्या बातम्या

भारतीय संघाला मोठा धक्का! अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेदरम्यान स्टार खेळाडू संघाबाहेर, आशियाई क्रीडा स्पर्धेतील सहभागावरही प्रश्नचिन्ह
भारतीय संघाला मोठा धक्का! अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेदरम्यान स्टार खेळाडू संघाबाहेर, आशियाई क्रीडा स्पर्धेतील सहभागावरही प्रश्नचिन्ह
IND vs AFG 2nd T20I Live Streaming : फ्री... फ्री... फ्री...! FanCodeवर पैसे मोजू नका; भारत-अफगाणिस्तानचा दुसरा टी-20 'इथे' पाहता येणार फुकटात; जाणून घ्या A टू Z
फ्री... फ्री... फ्री...! FanCodeवर पैसे मोजू नका; भारत-अफगाणिस्तानचा दुसरा टी-20 'इथे' पाहता येणार फुकटात; जाणून घ्या A टू Z
Women Asia Cup 2026 Prize Money : मोहसीन नक्वीकडून ट्रॉफी नाकारली; पण टीम इंडियावर पैशांचा वर्षाव, जाणून घ्या कोणाला किती रक्कम मिळणार?
मोहसीन नक्वीकडून ट्रॉफी नाकारली; पण टीम इंडियावर पैशांचा वर्षाव, जाणून घ्या कोणाला किती रक्कम मिळणार?
Pakistan Cricket Team: आधी इंग्लंडकडून दारुण पराभव अन् आता पाकिस्तानवर आयसीसीचा दुहेरी सर्जिकल स्ट्राईक! नेमकं घडलं तरी काय?
आधी इंग्लंडकडून दारुण पराभव अन् आता पाकिस्तानवर आयसीसीचा दुहेरी सर्जिकल स्ट्राईक! नेमकं घडलं तरी काय?

व्हिडीओ

Amit Shah On Hindi Language : भाषा, 'पाप' आणि राजकीय माप |Amit Shah On Hindi Language
Manoj Jarange Mumbai Andolan | लढणार एकटा, निर्धार पक्का | Special Report ABP Majha
Sangli AdityaRaj Patwardhan : आदित्यराज पटवर्धन यांच्या वारसाहक्कावरून वाद Special Report
Disha Salian Case CBI : सीबीआयचा FIR, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण? Special Report
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
BLOG : शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
Embed widget