India Schedule, Tokyo Olympic 2020: ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंचं उद्याचं शेड्यूल, महिला हॉकी संघाकडून पदकाची अपेक्षा
India Schedule, Tokyo Olympic 2020 Matches List: भारतीय महिला हॉकी संघ बुधवारी उपांत्य फेरीत चार वेळा ऑलिम्पिक पदक विजेता संघ अर्जेंटिनाशी भिडणार आहे.
![India Schedule, Tokyo Olympic 2020: ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंचं उद्याचं शेड्यूल, महिला हॉकी संघाकडून पदकाची अपेक्षा Tokyo Olympic India Schedule Matches Fixtures list tomorrow 4.08.2021 Expected Medal Winners India Schedule, Tokyo Olympic 2020: ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंचं उद्याचं शेड्यूल, महिला हॉकी संघाकडून पदकाची अपेक्षा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/30/705b4da86693eae2a31e5ebd428d951e_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Tokyo Olympic : भारतीय महिला हॉकी संघ आणि बॉक्सिंगच्या वेल्टर वेट कॅटेगरीत लवलीनाला बुधवारी अंतिम फेरीत पोहोचण्याची सुवर्णसंधी आहे. बॉक्सर लवलीनाचा सामना तुर्कीच्या सुरमेनेली बुसेन्झशी होईल. बुसेन्झने 2019 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. आधी मध्यम वजनाच्या प्रकारात बॉक्सिंग करणारी सुरमेनेली आता वजन कमी करून वेल्टर वेटमध्ये बॉक्सिंग करत आहे. अशा स्थितीत दोन बॉक्सर्समध्ये अतिशय अटीतटीचा सामना अपेक्षित आहे.
दुसरीकडे, भारतीय महिला हॉकी संघ बुधवारी उपांत्य फेरीत चार वेळा ऑलिम्पिक पदक विजेता संघ अर्जेंटिनाशी भिडणार आहे. हा सामना देखील अटीतटीचा असणार आहे. कारण भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला हरवल्यानंतर मानसिकदृष्ट्या मजबूत आहे. त्यामुळे भारतीय संघ उद्याचा सामना जिंकून पदक निश्चित करेल अशी आशा आहे.
कुस्तीमध्ये दीपक पुनिया आणि रवी दहिया यांचे उद्या सामने आहेत. सकाळी 8 वाजेनंतर कुस्तीमध्ये प्री क्वॉर्टरफायनल फेरीचे सामने सुरु होतील. अंशु महिलांच्या 57 किलो फ्रीस्टाईल स्पर्धेत मैदानात उतरेल. तसेच भालाफेकमध्ये नीरज चोप्रा आणि शिवपाल सिंह पात्रता फेरी खेळण्यासाठी बुधवारी सकाळी मैदानात उतरतील.
बुधवारी टोकियो ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंचे वेळापत्रक
टोकियो ऑलिम्पिकच्या 12 व्या दिवशी महिला हॉकी संघाला पदक मिळण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, बॉक्सिंगमध्ये पदक मिळवण्याच्या उद्देशाने लवलीना रिंगमध्ये उतरेल.
अॅथलेटिक्स
सकाळी 05:35 वाजेपासून नीरज चोप्रा, पुरुष भालाफेक पात्रता गट अ.
सकाळी 07:05 वाजेपासून शिवपाल सिंग, पुरुषांची भालाफेक पात्रता गट ब.
बॉक्सिंग
सकाळी 11 वाजता, लवलीना बोरगोहेन विरुद्ध बुसेनाज सुरमेनेली (तुर्की) महिला 69 किलो बॉक्सिंग उपांत्य फेरी
गोल्फ
सकाळी 4 वाजता, अदिती अशोक आणि दीक्षा डागर, महिलांच्या वैयक्तिक स्ट्रोक प्ले, पहिली फेरी
हॉकी
दुपारी 3.30 वाजता, भारत विरुद्ध अर्जेंटिना, महिला संघ उपांत्य फेरी
कुस्ती
सकाळी 8 वाजता, रवि कुमार विरुद्ध ऑस्कर टिगरेरोस उरबानो (कोलंबिया), पुरुष फ्रीस्टाइल 57 किलो
सकाळी 8 वाजता, अंशु मलिक विरुद्ध इरिना कुराचिकिना (बेलारूस), महिला फ्रीस्टाइल 57 किलो
सकाळी 8 वाजता, दीपक पुनिया विरुद्ध एकरेकेम एगियोमोर (नायजेरिया), पुरुष फ्रीस्टाइल 86 किलो
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)