akshya Sen vs Lee ZII Jia Paris Olympics 2024 Badminton पॅरिस : भारताचा स्टार बँडमिंटपटू लक्ष्य सेन आणि मलेशियाचा ली जी जिया यांच्यात कांस्य पदकासाठी लढत पार पडली. लक्ष्य सेननं मलेशियाच्या ली जी जिया याच्यावर पहिल्या पासून वर्चस्व ठेवलं होतं. लक्ष्य सेननं पहिला सेटमध्ये ली जी जियावर 21-13 असा विजय मिळवला.  दुसऱ्या सेटमध्ये मलेशियाच्या ली जी जिया यानं जोरदार आव्हान दिलं. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी आक्रमक खेळ केला. दुसरा सेट मलेशियाच्या ली जी जिया यानं21-16 असा  जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये ली जी जियानं आक्रमक खेळ केला. ली जी जियानं तिसरा सेट 21-11 असा जिंकला. दुसरा आणि तिसरा सेट जिंकत मलेशियाच्या ली जी जियानं कांस्य पदकावर नाव कोरलं. तर, लक्ष्य सेनचं कांस्य पदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं. हाताच्या कोपराला दुखापत झालेली असून लक्ष्य सेन मैदानावर लढत देत होता. मॅच सुरु असताना कोपरातून रक्त येत असून देखील त्यानं लढाऊ बाणा दाखवला.


लक्ष्य सेनला उपांत्य फेरीत परभवाचा सामना करावा लागला होता. डेन्मार्कच्या विक्टर एक्सेलसेन यानं लक्ष्य सेनचा पराभव  केला होता. विक्टरनं टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. त्यानं सुरुवातीला पिछाडीवर राहिल्यानंतर अनुभव पणाला लावत  लक्ष्य सेनला 22-20 आणि 21-14 अशा फरकानं पराभूत केलं होतं. त्यामुळं लक्ष्य सेन आणि ली झी जिया याच्या विरुद्ध कांस्य पदकासाठी मैदानात उतरावं लागलं. 


 भारतानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत तीन कांस्य पदकं जिंकली आहेत. तीन कांस्य पदकं नेमबाजी क्रीडा प्रकारात भारतानं जिंकली आहेत. लक्ष्य सेन ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये पदक मिळवणारा पहिला पुरुष खेळाडू ठरला असता.  



लक्ष्य सेन यांन उपांत्य पूर्व फेरीत भारताचा खेळाडू एचएस  प्रणय याचा पराभव केला होता. उपांत्य फेरीत त्यानं चीनच्या ताईपे के चाऊ चेन याला पराभूत करत उपांत्य फेरी गाठली होती. 


लक्ष्य सेननं उपांत्य फेरीतील पराभवानंतर कामगिरीवर भाष्य केलं. पहिला गेम जिंकला असता तर मॅच जिंकम्याची संधी होती. दुसऱ्या गेममध्ये देखील चांगली सुरुवात केली होती. मात्र, आघाडी कायम ठेवण्यात अपयश आल्याचं लक्ष्य सेन म्हणाला होता. लक्ष्य सेनकडून भारताला पदक मिळेल अशी अनेकांना आशा होती. 



दरम्यान, सायना नेहवालनं लंडन ऑलिम्पिक मध्ये बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक मिळवलं होतं. त्यानंतर, पी.व्ही. सिंधूनं रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवलं. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सिंधूनं  कांस्य पदक जिंकलं होतं.  


संबंधित बातम्या :



Novak Djokovic :आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण, पहिली मिठी लेकीला मारली, नोवाक जोकोविचचं स्वप्न पूर्ण