Paris Olympics 2024 Lakshya Sen: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics 2024) भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने (Lakshya Sen) 27 जुलैला झालेल्या साखळी फेरीतील सामन्यात विजय नोंदवला होता. या विजयासह लक्ष्य सेनने पुढच्या फेरीत प्रवेश मिळवला होता. मात्र हा विजय अमान्य करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लक्ष्य सेनला एक सामना जास्त खेळावा लागणार आहे. 


शनिवारी 27 जुलै रोजी झालेल्या बॅडमिंटन पुरुष एकेरीच्या गट-एलच्या पहिल्या सामन्यात लक्ष्य सेनने ग्वाटेमालाच्या केविन कॉर्डनचा पराभव केला होता. या सामन्यात लक्ष्यने केविनवर 21-8 आणि 22-20 अशा फरकाने विजय मिळवला होता. या गटात लक्ष्य सेनसह एकूण 4 खेळाडू होते. लक्ष्य सेनविरुद्ध पराभूत झालेला केविन कॉर्डनही याच गटाचा भाग होता. 


केविन कॉर्डनची माघार-


आता केविनने दुखापतीमुळे ऑलिम्पिकमधून आपले नाव मागे घेतले आहे. केविन कार्डनला डाव्या कोपराला दुखापत झाल्याचे त्याने हा निर्णय घेतला. केविनने नाव मागे घेताच लक्ष्य सेनचा विजय 'अवैध' ठरला. ग्वाटेमालाच्या खेळाडूने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतल्याने भारतीय बॅडमिंटन स्टार लक्ष्य सेनचा केविन कॉर्डनविरुद्धचा विजय गणला जाणार नाही, असे बॅडमिंटन जागतिक महासंघाने जाहीर केले.






बॅडमिंटन महासंघ काय म्हणाले?


बॅडमिंटन महासंघाने सांगितले की, ग्वाटेमालाचा पुरुष एकेरी खेळाडू डेव्हिड कॉर्डनने डाव्या कोपराच्या दुखापतीमुळे पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या बॅडमिंटन स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले आहे. आता लक्ष्यला त्याच्या गटातील सर्व खेळाडूंपेक्षा एक सामना जास्त खेळावा लागणार आहे. आता गटातील सर्व खेळाडू प्रत्येकी दोन सामने खेळणार आहेत, मात्र लक्ष्य सेनने याआधी एक सामना खेळला आहे.


लक्ष्या सेनचे पुढील सामने कधी?


लक्ष्यसेनसह बॅडमिंटन पुरुष एकेरीच्या ग्रुप-एलमध्ये फक्त इंडोनेशियाचा क्रिस्टी जोनाथन आणि बेल्जियमचा कॅरागी ज्युलियन उरले आहेत. लक्ष्य सेनचा पुढील सामना सोमवार, 29 जुलै रोजी कॅरागी ज्युलियनशी होईल आणि त्यानंतर त्याचा शेवटचा सामना बुधवारी, 31 जुलै रोजी क्रिस्टी जोनाथनशी होईल.


भारताचे अनेक खेळाडू अंतिम फेरीत-


10 मीटर एअर रायफल नेमबाजीच्या अंतिम फेरीत रमिता इलावेनिल वालारिवन आणि रमिता जिंदाल यांनी प्रवेश केल्यामुळे नेमबाजीत भारतासाठी हा चांगला दिवस होता. दुसरीकडे, संदीप सिंग पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेतून बाहेर आहे, पण अर्जुन बबुताने 630.1 गुणांसह अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. निखत झरीन, मनिका बत्रा, पीव्ही सिंधू, एचएस प्रणॉय यांनी आपापल्या खेळांच्या पुढील फेरीत प्रवेश केला आहे. 


संबंधित बातमी:


Photos: ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकताच नेटकऱ्यांना मनू भाकरची भुरळ; ग्लॅमरस लूकची रंगली चर्चा