Paris Olympics 2024 Lin Yu Ting Gender Controversy: सध्या जगभरात पॅरिस ऑलिम्पिकची (Paris Olympics 2024) चर्चा सुरु आहे. विविध देशातील खेळाडू उत्तम कामगिरी करत विविध पदके जिंकत आहे. याचदरम्यान पॅरिस ऑलिम्पिकमध्ये झालेल्या बॉक्सिंगच्या सामन्यावरुन वाद निर्माण झाला आहे. काही दिवसांआधी अल्जेरियन महिला बॉक्सर इमाने खलीफ चर्चेचा विषय होती. इमाने खलीफच्या लिंग पात्रतेचा वाद न संपताच आता नवीन प्रकरण समोर आलं आहे. तैवानची महिला बॉक्सर लिन यू टिंगने ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरी गाठताच प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
इमाने खलीफप्रमाणे लिन यू-टिंगवर 2023 च्या महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे ऑलिम्पिकमध्येही इमाने खलीफरख्या लिन यू-टिंगवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. तैवानच्या लिन यू-टिंगने उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवताच गोंधळ सुरू झाला. बॉक्सिंगच्या 57 किलो वजनी गटात सहभागी झालेल्या लिन यू-टिंगने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बल्गेरियाच्या स्वेतलाना स्टेनेव्हाचा पराभव केला. या सामन्यात तैवानच्या बॉक्सरने स्वेतलाना स्टेनेव्हाचा सहज पराभव केला. या विजयासह लिन यू-टिंगनेही पदक निश्चित केले.
इमान खलिफने उपांत्यपूर्व फेरीचा सामनाही जिंकला-
विशेष म्हणजे अल्जेरियाच्या इमान खलीफनेही उपांत्यपूर्व फेरीचा सामना जिंकला आहे. इमान खलीफने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात हंगेरीच्या लुका अण्णा हमोरीचा पराभव केला. या सामन्यात खलीफने 5-0 असा एकतर्फी विजय नोंदवला होता. आता ती 7 ऑगस्टला होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे.
महिला बॉक्सरविरुद्ध पुरुष रिंगणात?
बॉक्सिंगमध्ये इटलीची अँजेला कॅरिनी आणि अल्जेरियाची इमाने खलीफ या 66 किलो वजन गटामध्ये आमने-सामने होत्या. मात्र या सामन्यात अवघ्या 46 सेकंदात एका स्पर्धकाने सामन्यातून माघार घेतली. त्यानंतर अँजेला कॅरिनीने दावा केला त्यातून सध्या जगभरात आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वाद सुरु झाला आहे. 2023 वर्ल्ड चॅम्पियनशिप अंतिम सामन्यापूर्वी इमाने खलीफची लिंग चाचणी फेल ठरल्याने अपात्र घोषित करण्यात आलं होतं. असं असूनही महिलांच्या स्पर्धेत सहभागी केल्याने वादाला तोंड फुटलं आहे. इमाने खलिफ खरंच महिला खेळाडू आहे की पुरुष? यावर मोठा वाद निर्माण झाला आहे. बॉक्सिंगच्या झालेल्या या सामन्यात एका बायोलॉजिकल पुरुष बॉक्सरचा सामना महिलेशी केल्याचा आरोप केला जात आहे. कारण गेल्या वर्षी नवी दिल्लीत झालेल्या महिलांच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये इमाने ही टेस्टोस्टेरॉन आणि जेंडर एलिजिबीलिटी टेस्ट मध्ये अपात्र ठरली होती. त्यामुळेच तिला स्पर्धेतून बाद ठरवण्यात आले होते. असे असूनही ऑलिम्पिकमध्ये तिला सहभागी होण्याची परवानगी का देण्यात आली? अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. जगभरातून असंख्य क्रीडाप्रेमींनी अँजेला कॅरिनीला समर्थन दिलं असून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेवर टीका केली आहे.
संबंधित बातमी:
हिंमतीने लढली, 46 सेकंदात हरली! महिला बॉक्सरविरुद्ध पुरुष रिंगणात?; पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खळबळ