एक्स्प्लोर

धक्कादायक! ऑलिम्पिक खेळाडूला प्रियकराने पेट्रोल टाकून जिवंत जाळले; उपचारादरम्यान रेबेकाचा मृत्यू 

Ugandan Olympian Rebecca Cheptegei: पॅरिस ऑलिम्पिकच्या स्पर्धेनंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Ugandan Olympian Rebecca Cheptegei: पॅरिस ऑलिम्पिक 2024 ची (Paris Olympics 2024) स्पर्धा नुकतीच पार पडली. मात्र यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. युगांडाची ॲथलिट रेबेका चेप्टेगीचा दुदैवी मृत्यू झाला आहे. रेबेकाच्या एक्स बॉयफ्रेंडने तिच्या अंगावर पेट्रोल टाकत जाळल्याचा प्रयत्न केला. यामुळे रेबेका चेप्टेगीचे शरीर 75 टक्क्यांहून भाजले गेले. यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता रेबेका चेप्टेगीचा दुदैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

रेबेका चेप्टेगी नुकतीच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली होती. युगांडाच्या ऑलिम्पिक समितीने याबाबत माहिती दिली आहे. रेबेकाच्या आधीही महिला खेळाडूंची हत्या झाली होती. केनियामध्ये ऑक्टोबर 2021 पासून तीन महिला खेळाडूंची हत्या करण्यात आली आहे.

जमिनीवरुन सुरु होता वाद- 

रेबेकाने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भाग घेतला होता. रेबेका या स्पर्धेत 44 व्या क्रमांकावर होती. रेबेकाची हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव डिक्सन नदीमा असे आहे. आगीमुळे तोही भाजल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, रेबेका आणि तिच्या बॉयफ्रेंडमध्ये एका जमिनीवरून वाद सुरू होता. मात्र, अद्याप कुठलीही ठोस माहिती समोर आलेली नाही. रेबेकाला गंभीर अवस्थेत केनियातील रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे उपचारादरम्यान आज(दि.5) तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रेबेकाच्या कुटुंबाला धक्का बसला आहे. आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी रेबेकाच्या वडिलांनी केली आहे. रेबेकाच्या मृत्यूनंतर युगांडाच्या ॲथलेटिक्स फेडरेशनने शोक देखील व्यक्त केला आहे.

रेबेकाच्या आधी दोन महिला खेळाडूंची हत्या-

रेबेकाच्या आधी आणखी दोन खेळाडूंची हत्या झाली होती. एग्नेस तिरोपा आणि डमारिस मुटुआ यांची हत्या झाली. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी त्याच्या निकटवर्तीयांनाही जबाबदार धरले होते.

2022 मध्ये सुवर्णपदक-

रेबेका चेप्टेगीचा जन्म 22 फेब्रुवारी 1991 रोजी युगांडा येथे झाला. रेबेका 2010 पासून रेसिंग करत आहे. रेबेकाने 2022 मध्ये थायलंडमधील चियांग माई येथे जागतिक माउंटन आणि ट्रेल रनिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. 

संबंधित बातमी:

भारत अन् बांगलादेशची कसोटी मालिका रंगणार; सुरेश रैनाच्या विधानाने टीम इंडियाची वाढली चिंता!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indurani Jakhar  : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anjali Damania On Rajendra Ghanwat : राजेंद्र घनवट यांनी बीडच्या शेतकऱ्यांना छळून त्रास दिला:दमानियाAkola : अकोल्याच्या बाळापूरात क्षारयुक्त पाणी प्यावं लागत असल्यानं शेकडो ग्रामस्थांना किडनीचे आजारJob Majha | केंद्रीय रस्ते संशोधन संस्था येथे नोकरीच्या संधी | 01 April 2025 | ABP MajhaManoj Jarange on Beed : कळंब महिला हत्या प्रकरणावर मनोज जरांगे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indurani Jakhar  : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
Embed widget