ENG Vs SL, Innings Highlights : श्रीलंकन सेनेसमोर इंग्रजांनी गुडघे टेकले; विश्वविजेत्या इंग्लंडचा अवघ्या 156 धावात खुर्दा
ENG Vs SL, Innings Highlights : दोन्ही संघांनी आतापर्यंत 4-4 सामने खेळले असून त्यापैकी केवळ 1-1 सामने जिंकता आले आहेत. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक 43 धावा केल्या.
![ENG Vs SL, Innings Highlights : श्रीलंकन सेनेसमोर इंग्रजांनी गुडघे टेकले; विश्वविजेत्या इंग्लंडचा अवघ्या 156 धावात खुर्दा ODI World Cup 2023 England give target 157 runs against Sri Lanka Innings highlights M Chinnaswamy Stadium ENG Vs SL, Innings Highlights : श्रीलंकन सेनेसमोर इंग्रजांनी गुडघे टेकले; विश्वविजेत्या इंग्लंडचा अवघ्या 156 धावात खुर्दा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/26/38c484d21388f114e6c356f45d0e317d1698321698068736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बंगळूर : आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये रोमांचक सामन्यांचा टप्पा सुरूच आहे. आज (26 ऑक्टोबर) विश्वचषकात श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात सामना होत आहे. दोन संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आहे. या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेला विजयासाठी 157 धावांचे लक्ष्य दिले आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांनी आतापर्यंत 4-4 सामने खेळले असून त्यापैकी केवळ 1-1 सामने जिंकता आले आहेत. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक 43 धावा केल्या. तब्बल सहा फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद झाले.
England batting in the last 3 matches in World Cup:
— Johns. (@CricCrazyJohns) October 26, 2023
156/10 vs Sri Lanka.
170/10 vs South Africa.
215/10 vs Afghanistan.
World Champions getting destroyed in India....!!!! pic.twitter.com/daB08ugD5q
इंग्लंडला झटपट पाच धक्के दमदार सुरुवात करताना 27 वर्षांचा इतिहास कायम ठेवण्यासाठी दमदार सुरुवात केली आहे. 1996 पासून इंग्लंडला श्रीलंकेचा पराभव करता आलेला नाही.
ENGLAND BOWLED OUT FOR 156..!!!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 26, 2023
From 45/0 to 156/10 - The Lankan lions are roaring at the Chinnaswamy Stadium. pic.twitter.com/RyFwuRWHoi
इंग्लंडच्या विकेट्सची पडझड सुरूच राहिली आणि त्यांचा संपूर्ण संघ 33.2 षटकांत 156 धावांत गारद झाला. बेन स्टोक्सने सर्वाधिक 43 धावांची खेळी खेळली. श्रीलंकेच्या वेगवान गोलंदाजांनी एकूण सात विकेट घेतल्या. लाहिरू कुमाराने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. अँजेलो मॅथ्यूज आणि कसून रजिथा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
Gautam Gambhir said, "England batters played more for their reputation than for England". pic.twitter.com/nuCMhCclQI
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 26, 2023
या विश्वचषकात इंग्लंड आणि श्रीलंकेची कामगिरी काही विशेष झाली नाही. दोन्ही संघांनी आतापर्यंत चार सामने खेळले असून, तीनमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. श्रीलंकेचा एकमेव विजय नेदरलँडविरुद्ध होता. इंग्लंडने बांगलादेशला हरवून विजयाची चव चाखली होती. आता हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे.
England last won an ICC Cricket World Cup match against Sri Lanka in 1999.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 26, 2023
They've lost 4 consecutive World Cup matches against Sri Lanka. pic.twitter.com/vTo4RqMz1z
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)