(Source: ECI/ABP News/ABP Majha)
...म्हणून द्विशतकादरम्यान एकही सिक्सर नाही, कोहलीने रहस्य उलगडलं !
अँटीगा : वेस्ट इंडिजविरुद्धच्या अँटिगा कसोटीत भारताने तब्बल एक डाव आणि 92 धावांनी विजय मिळवला. भारताचा हा आशिया खंडाबाहेरील आजवरचा सर्वात मोठा विजय आहे.
या कसोटीत कर्णधार विराट कोहलीने त्याच्या करिअरमधील पहिलं द्विशतक ठोकून इतिहास रचला. वेस्ट इंडिजच्या मैदानावर असा विक्रम करणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. विराटने 283 चेंडूत 70.67 च्या सरासरीने 200 धावा पूर्ण केल्या. पण आपल्या या संपूर्ण खेळीमध्ये त्याने एकही षटकार ठोकला नाही.
या कसोटी सामन्यात विराट कोहलीने 200 तर रवीचंद्रन अश्विनने 113 धावांची खेळी खेळली. या दोघांच्या खेळीच्या जोरावर भारताने विंडिजसमोर पहिल्या डावात 566 धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र भारताकडून केवळ चारच षटकार ठोकण्यात आले होते. यामध्ये शिखर धवन आणि रिद्धिमान साहाने प्रत्येकी एक तर मोहम्मद शमीच्या 2 षटकारांचा समावेश होता.
कोहलीचा स्ट्राईक रेट अन्य भारतीय खेळाडूंपेक्षा खूप जास्त होता, पण त्याने आपल्या या खेळीत एकही षटकार लगावला नाही. ज्यामुळे त्याच्या फलंदाजीच्या कौशल्याला सिद्ध करून तो किती उंचीचा खेळाडू आहे हेही सांगतो.
सामन्यानंतर बोलताना कोहली म्हणाला की, आजकाल फलंदाजांपुढे एक आव्हान असते, जे पेलताना त्यांना स्वत:मध्ये बरेच बदल करावे लागतात. या कसोटीसाठी मी पाच फलंदाजांसोबत खेळत होतो, म्हणून मी षटकार न ठोकण्याचा निर्णय घेतला.
पाच फलंदाजांसोबत खेळताना सहावा फलंदाज म्हणून माझ्यावर मोठी जबाबदारी होती. त्यामुळे या जबाबादारीची जाणीव ठेवून, मैदानात उतरलो, आणि षटकार लगावण्यापेक्षा कोणतीही जोखीम न घेता खेळत राहणं पसंत केलं, असं कोहलीने सांगितलं.