एक्स्प्लोर
न्यूझीलंडचा पाकिस्तानवर 123 धावांनी विजय, मालिका 2-1 ने जिंकली
शेवटच्या कसोटी सामन्यात 123 धावांनी पराभूत केले. ह्या विजयासह न्यूझीलंडने तीन कसोटी सामन्यांची मालिका 2-1 ने खिश्यात घातली. जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या न्यूझीलंडने तब्बल 49 वर्षानंतर पाकिस्तान विरुद्ध मायदेशाबाहेर मालिका जिंकली.
आबुधाबी : न्यूझीलंडच्या संघाने शानदार गोलंदाजीच्या बळावर पाकिस्तानला तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात 123 धावांनी पराभूत केले. ह्या विजयासह न्यूझीलंडने तीन कसोटी सामन्यांची मालिका 2-1 ने खिश्यात घातली. जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या न्यूझीलंडने तब्बल 49 वर्षानंतर पाकिस्तान विरुद्ध मायदेशाबाहेर मालिका जिंकली.
न्यूझीलंडने पहिल्या कसोटीत पाकिस्तानला चार धावांनी पराभूत करुन मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. मात्र दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने चांगली कामगिरी करत एक डाव आणि 16 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-1 अशी बराबरी केली. त्यामुळे निर्णायक असलेली तिसरी कसोटी न्यूझीलंडने जिंकून मालिका जिंकली.
शेवटच्या कसोटीच्या पाचव्या दिवशी न्यूझीलंडने 353 धावांवर आपला डाव घोषीत केला, आणि पाकिस्तानला 280 धावांचं आव्हान दिलं. मात्र पाकिस्तानचा संघ 156 धावांवर गारद झाला, आणि न्यूझीलंडच्या संघाने 123 धावाने विजय मिळवला.
न्यूझीलंडकडून कर्णधार केन विलियम्सने 139 तर हेन्री निकोलसने 126 धावांची खेळी केली. टिम साउदी, एजाज पटेल आणि विलियम सोमरविले या तिघांनी प्रत्येकी तीन-तीन बळी घेत मोलाची कामगिरी बजावली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
क्राईम
Advertisement