Neeraj Chopra : नीरज चोप्राने स्वतःचाच विक्रम मोडला! डायमंड लीगमध्ये 89.94 मीटर अंतर कापले, जिंकले रौप्य पदक
Neeraj Chopra Sets Record : 24 वर्षीय नीरज चोप्राने डायमंड लीगमध्ये 89.94 मीटरच्या आपल्या शानदार थ्रोसह 89.30 मीटरचा स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडला.
Neeraj Chopra Sets Record : टोकियो ऑलिम्पिकमध्ये मेहनत दाखवून सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा एकापाठोपाठ एक विक्रम करत आहे. नुकत्याच झालेल्या पावो नूरमी ऍथलेटिक्स मीटमध्ये रौप्य पदक जिंकून राष्ट्रीय विक्रम केल्यानंतर त्याने पुन्हा एकदा 89.94 मीटरचा राष्ट्रीय विक्रम केला आहे. तसेच, त्याने डायमंड लीगमध्ये रौप्य पदक जिंकले आहे.
शानदार थ्रोसह 89.30 मीटरचा स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडला.
24 वर्षीय नीरज चोप्राने डायमंड लीगमध्ये 89.94 मीटरच्या आपल्या शानदार थ्रोसह 89.30 मीटरचा स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडला. त्याने अलीकडेच जूनच्या सुरुवातीला तुर्कू येथे पावो नुर्मी गेम्समध्ये ही कामगिरी केली. विशेष म्हणजे यावेळीही नीरज चोप्राने रौप्य पदक जिंकले.
Olympic gold medallist Neeraj Chopra set a new national record with a throw of 89.94m as he finished 2nd at Stockholm Diamond League
— ANI (@ANI) June 30, 2022
Neeraj's meet record was broken by Peters Anderson with a throw of 90.31m, as per Sports Authority of India
(Source: Chopra's Twitter handle) pic.twitter.com/fLRPrtjdHE
विक्रम फार काळ टिकला नाही.
गुरुवारी स्टॉकहोममधील प्रतिष्ठित डायमंड लीग मीटमध्ये, नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 89.94 मीटर फेकून स्वतःचा 89.30 मीटरचा राष्ट्रीय विक्रम मोडला, हा त्याचा डायमंड लीग संमेलनातील विक्रमही बनला, परंतु तो फार काळ टिकला नाही. ग्रेनेडाचा विश्वविजेता अँडरसन पीटर्सने तिसऱ्या प्रयत्नात 90.31 मीटर फेक करून नवा मीट विक्रम प्रस्थापित केला.
रौप्य पदकावर समाधान मानावे लागले
यानंतर नीरज चोप्रा पहिल्या प्रयत्नात त्याच्यापेक्षा चांगली कामगिरी करू शकला नाही आणि त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. डायमंड लीग मीट दरम्यान, नीरज चोप्राने त्याच्या पाच थ्रो प्रयत्नांमध्ये 84.37 मीटर, 87.46 मीटर, 84.77 मीटर, 86.67 आणि 86.84 मीटर अंतर कापले. आणि अँडरसन पीटर्स 90.31 मीटरसह चॅम्पियन बनला. त्याच्या पाचव्या प्रयत्नात ज्युलियन वेबरने 89.08 मीटर अंतरासह कांस्यपदक जिंकले.
हे देखील वाचा-