या घटनेनं ललिताच्या कुटुंबाला फारच मोठा धक्का बसला आहे.
2/8
राष्ट्रीय स्तरावर कबड्डी खेळणारा रोहित स्पोर्ट्स कोटामधून नौसेनेत भरती झाला होता. चार वर्षापूर्वी त्याची कॉलेजमध्ये ललिताशी ओळख झाली होती.
3/8
रोहित आणि ललिताचा प्रेमविवाह होता. सुरुवातीला दोघं मित्र होते. त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि 1 वर्षाआधी त्यांनी कुटुंबीयांच्या संमतीनं विवाह केला होता. सुरुवातीला सारं काही ठीक होतं. पण ललिताच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, रोहित आणि त्याचा कुटुंबीयांनी तिच्याकडे मोठी गाडी आणि हुंड्यासाठी तगादा लावला. त्यानंतर जवळजवळ महिन्याभरापूर्वीच ललिता सासर सोडून आपल्या माहेरी राहण्यासाठी आली होती. तेव्हापासून ती प्रचंड तणावाखाली होती.
4/8
रोहित आणि ललिताच्या लग्नाला अवघं वर्षही झालं नव्हतं.
5/8
दरम्यान, पत्नीच्या मृत्युची बातमी समजल्यानंतरही रोहित चिल्लर अद्याप दिल्लीमध्ये परतलेला नाही. ललिताच्या कुटुंबीयांनी मागणी केली आहे की, रोहित आणि त्याच्या कुटुंबीयांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी. तसेच त्यांनी आरोपही केला आहे की, त्यांनी वारंवार ललिताला हुंड्यासाठी त्रास दिला. तसंच रोहितनं तिच्याकडे दुर्लक्ष केल्यानं तिनं हे पाऊल उचललं.
6/8
ललितानं आपल्या सासू-सासऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. ललितानं सुसाइड नोटही लिहली आहे. 'रोहित आणि त्याचे कुटुंबीय मला बरीच मारहाण करतात. तसंच रोहितला देखील माझ्यासोबत राहायचं नव्हतं.'
7/8
सोमवारी ललिताची चिल्लरचा मृतदेह तिच्या रुममध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
8/8
भारताच्या राष्ट्रीय कब्बडी संघातील आणि प्रो कबड्डी लीगमधील स्टार खेळाडू रोहित चिल्लरच्या पत्नी ललिता चिल्लरनं दिल्लीमध्ये आपल्या माहेरी नांगलोईमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.