एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईचा घरच्या मैदानावर 4 विकेट्सने विजय!
मुंबई : हार्दिक पांड्याच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने यंदाच्या आयपीएलमधला पहिला विजय साजरा केला. वानखेडेच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सने मुंबईला विजयासाठी 179 धावांचं आव्हान दिलं होतं.
मुंबईचा युवा फलंदाज नितीश राणा आणि हार्दिक पांड्या यांनी मुबईच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. राणाने 29 चेंडूत 50 धावा ठोकत मुंबईला विजयाच्या जवळ नेलं. मात्र 50 धावांवर तो बाद झाला. त्यानंतर हार्दिक पांड्याने मुंबईला विजय मिळवून दिला.
हार्दिक पांड्याने 11 चेंडूत 2 षटकार आणि तीन चौकारांच्या साहाय्याने महत्वपूर्ण 29 धावा केल्या. अखेरच्या षटकात 6 चेंडूत 11 धावांची गरज होती. मात्र हार्दिक पांड्याने हे आव्हान एक चेंडू राखून पूर्ण केलं.
कोलकात्याने चांगली धावसंख्या उभी केली असली तरी त्यांचं खराब क्षेत्ररक्षण या पराभवाला कारणीभूत ठरलं. अखेरच्या षटकात हार्दिक पांड्याचा झेल सोडण्याची चूक कोलकात्याच्या खेळाडूने केली. तर खराब क्षेत्ररक्षणामुळे अनेक धावाही द्याव्या लागल्या.
कोलकात्याकडून अंकित राजपूतने 3 गडी बाद केले, तर ख्रिस वोक्स, सुनील नारायण आणि फिरकीपटू कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
गेल्या सामन्यात गुजरात लायन्सला 10 विकेट्सने धूळ चारणाऱ्या कोलकात्याची फलंदाजी यावेळी निराशाजनक राहिली. कर्णधार गौतम गंभीर आणि ख्रिस लीन यांनी चांगली सुरुवात केल्यानतंर मधल्या फळीतील फलंदाजांना अपेक्षित कामगिरी बजावता आली नाही. गंभीर 19, लीन 32, उथप्पा 4, युसूफ पठाण 6 आणि सूर्यकुमार यादव 17 धावा करुन माघारी परतला.
मनिष पांडेच्या तुफानी 81 धावांच्या बळावर कोलकात्याने 178 धावांपर्यंत मजल मारली. मनिष पांडेने 47 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारांच्या सहाय्याने नाबाद 81 धावा ठोकल्या.
मुंबई इंडियन्सचा गोलंदाज क्रुनल पांड्याने तीन विकेट्स घेत कोलकात्याला रोखण्यात यश मिळवलं. तर लासिथ मलिंगाने 2 गडी बाद केले. मिचेल मॅक्लंघन आणि जसप्रित बुमरा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement