एक्स्प्लोर
धोनीला कर्णधारपद सोडण्यास भाग पाडलं : सूत्र
मुंबई: महेंद्रसिंह धोनीने टीम इंडियाचं कर्णधारपद सोडल्यानंतर, क्रिकेटचाहत्यांनी हळहळ व्यक्त केली. धोनीने अचानक वन डे आणि टी ट्वेण्टीचं कर्णधारपद सोडल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
मात्र आता धोनीच्या राजीनाम्याबाबत नवी धक्कादायक माहिती समोर येत आहे. धोनीने कर्णधारपद सोडलं की त्याला सोडण्यासाठी भाग पाडलं, असा नवा प्रश्न उभा राहिला आहे.
'हिंदुस्तान टाइम्स'ने सूत्रांच्या माहितीवरुन काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
"धोनी स्वत: कर्णधारपदावरुन पायउतार झाला नाही. निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद हे गेल्या आठवड्यात नागपुरात धोनीला भेटले. त्यावेळी नागपुरात झारखंड आणि गुजरात यांच्यात रणजी सामना सुरु होता. धोनी झारखंडच्या टीमचा मार्गदर्शक म्हणू काम पाहात होता. त्यादरम्यान दोघांची भेट झाली" अशी माहिती सूत्रांनी दिल्याचं 'हिंदुस्तान टाइम्स'ने म्हटलं आहे.
धोनीने जेव्हा कर्णधारपदाचा राजीनामा दिला, तेव्हा प्रसाद म्हणाले होते, "अचूक वेळ साधणाऱ्या धोनीला सलाम. विराट कोहली सध्या कसोटी क्रिकेटमध्ये संघाचं नेतृत्व सिद्ध केल्याचं धोनीला माहित होतं"
कर्णधारबदलीची प्रक्रिया सप्टेंबरपासूनच?
मात्र कोहलीकडेच कर्णधारपद सोपवण्याची प्रक्रिया सप्टेंबर महिन्यापासूनच सुरु झाली होती, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचं 'हिंदुस्तान टाइम्स'ने म्हटलं आहे.
बीसीसीआयच्या नव्या निवडसमितीची घोषणा 21 सप्टेंबरला झाली आणि तेव्हापासूनच कर्णधारही बदलाची प्रक्रिया सुरु झाली.
धोनीचे 6 चलाख निर्णय, ज्याला तुम्हीही सॅल्युट कराल!
पाच सदस्यीय समितीला 2019 च्या विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट संघाची बांधणी करायची होती. त्याची सुरुवात धोनीच्या कर्णधारपदापासून सुरु झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. धोनीने सध्या वयाची पस्तीशी ओलांडली आहे. 2019 पर्यंत त्याने 37 वर्ष पूर्ण केलेले असतील. त्यामुळे निवड समितीने विराट कोहलीकडेच संघाची धुरा देण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या असं 'हिंदुस्तान टाइम्स'ने म्हटलं आहे. याबाबत धोनीशीही नागपूरमध्ये चर्चा झाली. झारखंड-गुजरात यांच्यातील रणजी सामन्यावेळी ही चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.कोहली कर्णधार, युवीचं कमबॅक, टीम इंडियाची घोषणा
या सर्व प्रकारानंतर धोनीनेही जास्त लांबड न लावता, त्याचा निर्णय बीसीसीआयला कळवला. धोनीने 4 जानेवारीला आपण वन डे आणि टी ट्वेण्टी संघाच्या कर्णधारपदावरुन पायउतार होत असल्याचं जाहीर केलं. धोनीवर कर्णधारपद सोडण्यासाठी दबाव होता. एककीकडे कोहली कसोटी संघाचं नेतृत्त्व सिद्ध करत होता. वन डेमध्येही त्याची कामगिरी सातत्यपूर्ण होती. दुसरीकडे निवड समितीसमोर 2019 चा विश्वचषक आहे. त्यातच वन डेमध्ये धोनीच्या नेतृत्त्वात टीम इंडिया काहीशी पिछाडीवर पडली होती. भारताने 2015 मध्ये घरच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका गमावली, तिकडे ऑस्ट्रेलियात भारताचा 1-4 असा पराभव झाला, तर न्यूझीलंडविरुद्ध भारताने 3-2 असा विजय मिळवला. भारताचा गेल्या वर्षात 7 वनडे सामन्यात विजय आणि 6 सामन्यात पराभव झाला. मात्र कसोटी संघाच्या तुलनेत भारताच्या वन डे संघाची तगडी निवड झाली नव्हती, असा धोनी कॅम्पचा दावा होता. मात्र कसोटीसाठी 5-5 दिवस मैदानात थांबावं लागत असल्याने, निवड समिती आपल्या खास खेळाडूंना 2019 साठी राखीव ठेवू इच्छितात. त्याचाच परिणाम म्हणून, न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संपूर्ण ताकदीचा संघ उतरवला. तर न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी आर अश्विन, रवींद्र जाडेजा आणि मोहम्मद शमी या मुख्य गोलंदाजांना बाहेर ठेवलं. निवड समितीचं टार्गेट 'विश्वचषक 2019' आहे. त्यामुळे भारतीय संघाची मोर्चेबांधणी पाहता, धोनीने कर्णधारपद सोडलं की त्याला सोडायला लावलं, याचा अंदाज बांधता येऊ शकेल. मात्र त्याची अधिकृत माहिती समोर येणं कठीण आहे. संबंधित बातम्याकोहली कर्णधार, युवीचं कमबॅक, टीम इंडियाची घोषणा
कोहलीच्या नेतृत्त्वात धोनी कोणत्या क्रमांकावर खेळणार?
धोनीला कर्णधार बनवणारा मराठमोळा माणूस!
धोनीचे 6 चलाख निर्णय, ज्याला तुम्हीही सॅल्युट कराल!
कर्णधारपद सोडण्यामागचा 'कूल धोनी'चा मास्टर प्लान!
धोनीच्या कर्णधारपदाच्या राजीनाम्याची पाच कारणं
धोनीऐवजी सुशांत सिंगचा फोटो, परदेशी वेबसाईटला विरुचे फटके
भज्जीचा ट्विटरवरुन टीम इंडियाच्या निवडीवर आक्षेप
धोनीची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही: विराट कोहली
... म्हणून सेहवाग आतापर्यंत धोनीच्या राजीनाम्यावर बोलला नव्हता!
BCCI च्या निवड समितीच्या अध्यक्षपदी एमएसके प्रसाद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement