एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शमीविरुद्ध माझ्याकडे पुरावे, आता त्याला कोर्टातच खेचेन : हसीन जहां
'मी शेवटच्या श्वासापर्यंत मोहम्मद शमीला घटस्फोट देणार नाही. शमीवर केलेल्या सर्व आरोपांचे पुरावेही माझ्याकडे आहेत. त्यामुळे मी त्याला लवकरच कोर्टात खेचेन.'
कोलकाता : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर त्याच्या पत्नीने गंभीर आरोप केल्याने क्रिकेट विश्वात एकच खळबळ माजली आहे. शमीचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप हसीन जहांने केला आहे.
याचदरम्यान, शमीच्या पत्नीनं एक नवं वक्तव्य केलं. आहे. 'मोहम्मद शमी हा एक फ्लर्टी माणूस आहे.' असा थेट आरोप तिने केला आहे.
याबाबत बोलताना हसीन जहां म्हणाली की, 'मी शेवटच्या श्वासापर्यंत मोहम्मद शमीला घटस्फोट देणार नाही. शमीवर केलेल्या सर्व आरोपांचे पुरावेही माझ्याकडे आहेत. त्यामुळे मी त्याला लवकरच कोर्टात खेचेन.' बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्ट खेळाडूंच्या यादीतून शमीचं नाव वगळलं! या सर्व प्रकारादरम्यान शमीला बीसीसीआयनेही मोठा धक्का दिला आहे. बीसीसीआयने कालच (बुधवार) कॉन्ट्रॅक्ट खेळाडूंच्या यादीतून शमीला वगळलं आहे. शमीला नेमकं का वगळलं याचं कारण स्पष्ट नसलं तरी एकूणच त्याला याच प्रकाराचा फटका बसल्याची चर्चा आहे. अनेक तरुणींशी शमीचे अनैतिक संबंध, पत्नीचा फेसबुकवर आरोप हसीन जहांने मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून फेसबुकवर 11 खळबळजनक पोस्ट केल्या. शमीने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोपही तिने केला आहे. शमीच्या पत्नीने पोस्ट केलेल्या स्क्रीनशॉट्समध्ये काही महिलांचे फोटो आणि अश्लील चॅट दिसत आहेत. यापैकी कोणत्याही चॅटमध्ये शमीची ओळख पटत नाही. मात्र 'एबीपी आनंदो'च्या पत्रकार राजर्षी दत्ता गुप्ता यांनी हसीन जहांशी संपर्क साधला असता हे फेसबुक अकाऊण्ट आपलंच असल्याचं त्यांनी सांगितलं. 27 वर्षीय मोहम्मद शमीचं लग्न 2014 मध्ये झालं होतं. त्यांना आयरा ही मुलगी आहे. पोस्टमध्ये कोणाचा उल्लेख? हसीन जहांने नागपूर आणि पाकिस्तानातील काही महिलांचा उल्लेख केला आहे. फेसबुक पोस्टमध्ये संबंधित महिलांची नावं स्पष्ट दिसत आहेत. एका फोटोमध्ये तर सांबामध्ये राहणारी एक महिला शमीची गर्लफ्रेण्ड असल्याचा दावाही हसीनजहांने केला आहे. एक तरुणी 'आय मिस यू' असा मेसेज शमीला करते, त्यावर 'कम टू माय रुम' असा रिप्लाय तो करताना दिसत आहे. हसीनजहांचे आरोप मोहम्मद शमी आणि त्याच्या कुटुंबीयांवर हसीन जहांने अनेक गंभीर आरोप केले आहेत. शमीने सातत्याने आपला शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचं ती सांगते. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरुन परतल्यानंतरही त्याने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप तिने केला. शमी आणि त्याच्या कुटुंबाने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही दावा हसीन जहांने केला. 'शमी अनेक महिलांसोबत अश्लील चॅट करायचा. जेव्हा त्याचा फोन माझ्या हाती लागला, तेव्हा तो 'लॉक' होता. मात्र वेगवेगळे पॅटर्न्स वापरल्यावर अखेर फोन अनलॉक झाला. अखेर मला या गोष्टींचा उलगडा झाला. शमीचे सगळे कॉल डिटेल्स आणि स्क्रीनशॉट्स माझ्या हाती लागले. आपला फोन गायब झाल्याचं समजताच तो चांगलाच भडकला होता.' असंही हसीन जहांने 'एबीपी'शी बोलताना सांगितलं. फेसबुक वॉलवरुन या पोस्ट डीलीट कराव्यात, यासाठी आपल्यावर दबाव टाकला जात असल्याचंही हसीन जहांने सांगितलं. 8 जानेवारीला काय झालं? 'उत्तर प्रदेशमध्ये मला मारहाण केली जायची. माझं मानसिक आणि शारीरिक शोषण व्हायचं. शमीचं पूर्ण कुटुंब मला शिवीगाळ करत असे. सूर्योदयापासून रात्री दोन-तीन वाजेपर्यंत हा प्रकार चालायचा', असं तिने सांगितलं. जाधवपूर पोलिसात हिंसाचाराची माहिती दिली. 'कदाचित त्याच्या कुटुंबाने माझी हत्याही केली असती. त्यांनी माझा जीव घेण्याचा प्रयत्नही केला' असं हसीन जहां सांगते. 'मी अजूनही पोलिसात तक्रार दिलेली नाही. 8 जानेवारीला उत्तर प्रदेशमध्ये मी घरगुती हिसांचाराची बळी पडले. त्यानंतर मी कोलकात्याला गेले आणि स्थानिक पोलिसात माहिती दिली. अद्यापही कायदेशीर कारवाईबाबत मी विचार करत आहे' अशी माहिती हसीन जहांने दिली. VIDEO : संबंधित बातम्या : बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्ट खेळाडूंच्या यादीतून शमीचं नाव वगळलं VIDEO : थेट कॅमेऱ्यासमोर येत हसिन जहांचे शमीवर गंभीर आरोप पत्नीच्या आरोपांवर मोहम्मद शमीचं स्पष्टीकरण मोहम्मद शमीवरील आरोपांवर बीसीसीआयची प्रतिक्रिया अनेक तरुणींशी शमीचे अनैतिक संबंध, पत्नीचा फेसबुकवर आरोपI've done everything he wanted me to do. He has tortured me & hasn't treated me like his wife. He's a big flirt. I'm not going to divorce him till my last breath. I've all the evidences & will soon drag him to the court: Hasina Jahan, wife of cricketer Mohammad Shami in Kolkata pic.twitter.com/2fwydaKRfC
— ANI (@ANI) March 7, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्रीडा
क्राईम
राजकारण
Advertisement