एक्स्प्लोर
Advertisement
मोहम्मद कैफ दुसऱ्यांदा बाबा बनला!
लखनौ : भारताचा माजी क्रिकेटर मोहम्मद कैफ दुसऱ्यांदा बाबा बनला आहे. कैफच्या घरी छोट्या परीचा जन्म झाला आहे. मोहम्मद कैफने स्वत: ट्विटरवरुन याची माहिती दिली.
यानंतर कैफवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, आर पी सिंह, आकाश चोप्रासह अनेक खेळाडूंनी मोहम्मद कैफला शुभेच्छा दिल्या.
मोहम्मद कैफ दुसऱ्यांदा बाबा बनला आहे. त्याला पाच वर्षांचा मुलगा असून त्याचं कबीर आहे.
https://twitter.com/MohammadKaif/status/849554489837223937
कैफचं ट्वीट
मोहम्मद कैफने मंगळवारी ट्वीट केलं की, मला हे सांगताना अतिशय आनंद होतोय की, आमच्या कुटुंबात नव्या सदस्याची एन्ट्री झाली आहे. पूजा आणि मी एक सुंदर आणि सृदृढ मुलीचे आई-बाबा बनलोय.
https://twitter.com/MohammadKaif/status/849223670048411649
शुभेच्छांचा वर्षाव
कैफने ये ट्वीट करताच त्याच्यावर शुभेच्छांचा जणू पाऊसच पडला. सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, इरफान पठाण, आकाश चोप्रा, हरभजन सिंहसह अनेक खेळाडूंनी त्याला शुभेच्छा दिल्या.
https://twitter.com/virendersehwag/status/849555194690113537
https://twitter.com/anilkumble1074/status/849287863715975168
https://twitter.com/sachin_rt/status/849281899377958913
https://twitter.com/IrfanPathan/status/849256110481592320
https://twitter.com/harbhajan_singh/status/849297291437539331
2011 मध्ये लग्न
माजी क्रिकेटर मोहम्मद कैफचा विवाह 2011 मध्ये पूजा यादवसोबत झाला होता. पूजा एक पत्रकार असून ती नोएडामध्येच काम करतो.
दरम्यान, मोहम्मद कैफ मोठ्या काळापासून टीम इंडियातून बाहेर असून तो सध्या रणजी सामन्यात खेळतो. याशिवाय आयपीएलच्या यंदाच्या मोसमात त्याच्यावर गुजरात लायन्स संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कैफ याआधी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघासाठीही खेळला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
क्रीडा
Advertisement