एक्स्प्लोर
मिसबाह उल हकच्या नावावर नको असलेला विक्रम!

ब्रिजटाऊन : पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार मिसबाह उल हकने असा विक्रम बनवला आहे, जो आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाला बनवता आला नाही, किंवा कोणालाही हा विक्रम बनवावा वाटणार नाही. कसोटी क्रिकेटमदध्ये तीन वेळा 99 धावांवर बाद झालेला मिसबाह हा पहिला फलंदाज बनला आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यातल्या लागोपाठ दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल हकचं शतक अवघ्या एका धावेने हुकलं. त्यामुळे कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक तीनवेळा एका धावेने शतक हुकणारा फलंदाज हा अनोखा विक्रम त्याच्या नावावर जमा झाला. 2011 साली पाकिस्तानच्या न्यूझीलंड दौऱ्यातल्या वेलिंग्टन कसोटीत मिसबाह पहिल्यांदा 99 धावांवर बाद झाला. वेलिंग्टन कसोटीच्या पहिल्या डावात त्याला ख्रिस मार्टिनने 99 धावांवर पायचीत केलं होतं. त्यानंतर आता विंडीज दौऱ्यातल्या जमैकाच्या पहिल्या कसोटीत पाकिस्तानच्या कर्णधारावर पहिल्या डावात 99 धावांवर नाबाद राहण्याची वेळ आली होती. आता बार्बाडोसच्या दुसऱ्या कसोटीत विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने मिसबाहचा नेमका 99 धावांवर काटा काढला. मिसबाहच्या ग्लोव्हजला चाटून उडालेला चेंडू दुसऱ्या स्लीपमध्ये शाय होपने झेलला. दरम्यान, जगभरात 79 फलंदाज 99 धावांवर बाद झाले आहेत किंवा नाबाद राहिले आहेत. मायकर आथर्रटन, ग्रेग ब्लॅवेट, सर रिची रिचर्डसन, बॉयकॉट, सायमन कॅटिच, सौरव गांगुली, सलीम मलिक, मायकल स्मिथ आणि जॉन राईट यांनी कसोटी क्रिकेट कारकीर्दीत दोन वेळा 99 धावा केल्या आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























