एक्स्प्लोर
Advertisement
टॅक्स चोरी प्रकरणी मेसी वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार
मुंबई: स्पेनच्या न्यायालयाने कर चोरीप्रकरणात बार्सिलोना स्ट्राइकर लियोनेल मेसी आणि त्याच्या वडीलांना 21 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. पण या निकाला विरोधात मेसी वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार आहे.
मेसीच्या कारवासाची शिक्षा माफ होण्याची शक्यता आहे. कारण, कोणत्याही अहिंसक गुन्ह्यातील दोन वर्षांपेक्षा कमी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या व्यक्तीची शिक्षा स्पेन मध्ये माफ होऊ शकते.
मेसीच्या प्रतिनिधिंनी दिलेल्या माहितीनुसार, मेसीने आणि त्याच्या वडीलांनी कोणतीही चूक केली नाही. हे वरिष्ठ न्यायालयाला दाखवून देण्यात यशस्वी होईल, अशी मेसीला अशा असल्याने, मेसी वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार आहे.
मेसी आणि त्याचे वडील खोर्गो होरसियो मेसी यांच्यावर ४० लाख यूरोंची कर चोरीचा आरोप आहे. मेसी आणि त्याच्या वडीलांनी २००७-०९ दरम्यान शेल कंपनीच्या माध्यमातून ४० लाख यूरोचा अर्थिक अपहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement