एक्स्प्लोर

कर्णधारपद सोडण्यामागचा 'कूल धोनी'चा मास्टर प्लान!

मुंबई: भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने काल अचानक वनडे आणि टी-20 संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देऊन सगळ्यांनाच मोठा धक्का दिला. पण धोनीचा कोणाताही निर्णय हा झटपट घेतलेला नसतो. त्यामागे असतं प्रचंड प्लॅनिंग आणि हे आजवर आपल्याला अनेकदा दिसूनही आलं आहे. 2019 साली इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकात धोनीची खेळण्याची इच्छा आहे. त्यामुळेच धोनीनं हा निर्णय घेतला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या भलताचफॉर्मात आहे. त्यामुळे त्याच्या साथीनं खेळत राहणं हेच धोनीसाठी योग्य आहे. म्हणूनच धोनीनं योग्य वेळी हा निर्णय घेतला. धोनीनं बोर्डाला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे की, मी वनडे आणि टी-20 संघाचं कर्णधारपद सोडत आहे. पण विराट कोहलीसाठी मी मेन्टॉर म्हणून काम करण्यासाठी तयार आहे. जगातील सर्वात उत्कृष्ट फिनिशर अशी धोनीची इमेज गेल्या काही वर्षात तयार झाली होती. पण मागील काही सामन्यापासून धोनीची जादू काहीशी कमी झाल्याचं वारंवार दिसून आलं आहे. यूएसएमध्ये खेळविण्यात आलेल्या टी-20 सामन्यात ड्वेन ब्राव्होनं धोनीला विजयापासून रोखलं होतं. मागील काही सामन्यांमध्येही धोनीची कामगिरी यथातथाच राहिली होती. दुसरीकडे टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली सातत्यानं उत्कृष्ट कामगिरी करत आहे. मागील सोळा महिन्यात भारतीय कसोटी संघानं श्रीलंका (2-1), द. आफ्रिका (3-0), वेस्ट इंडिज (2-0), न्यूझीलंड (3-0) आणि इंग्लंड (4-0) मालिका जिंकल्या होत्या. यावेळी विराटनं तब्बल 1600 हून अधिका धावा केल्या आहेत. तर धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना वनडे सामन्यातही त्याने धडाकेबाज कामगिरी केलं आहे. तर 15 वनडे सामन्यात 75च्या सरासरीनं तब्बल 948 धावा केल्या आहेत मागील काही दिवसांपासून अनेक क्रिकेट चाहत्यांकडून विराटला वनडे आणि टी-20चं कर्णधारपद द्यावं ही मागणी होत होती. त्यामुळे वारे कोणत्या दिशेनं वाहू लागले आहेत हे धोनीनं अचूक ओळखलं आणि वेळीच योग्य तो निर्णय घेऊन तो मोकळाही झाला. राजीनामा दिल्यानंतर धोनीची बीसीसीआय मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्याशी प्रदीर्घ बातचीत झाली. असंही समजतं आहे की, 2019च्या विश्वचषकापर्यंत खेळत राहण्याची इच्छा त्यानं व्यक्त केली आहे. एकाच कर्णधाराकडे तीनही फॉर्मेटचं कर्णधारपद असावं असं धोनीला वाटतं. त्यामुळे धोनीनं राजीनामा देऊन विराटकडे जबाबदारी सोपावली आहे. संबंधित बातम्या: धोनीच्या कर्णधारपदाच्या राजीनाम्याची पाच कारणं
 
महत्त्वाच्या बातम्या

Sri Lanka A vs India A, Final: भारत 'अ' संघाने श्रीलंका 'अ' संघाला 66 धावांनी पराभूत करून तिरंगी मालिका जिंकली; वैभव सूर्यवंशीचा जाळ अन् धूर संगटच, 20 वर्षांपूर्वीचा पराक्रम मोडीत
भारत 'अ' संघाने श्रीलंका 'अ' संघाला 66 धावांनी पराभूत करून तिरंगी मालिका जिंकली; वैभव सूर्यवंशीचा जाळ अन् धूर संगटच, 20 वर्षांपूर्वीचा पराक्रम मोडीत
Yashasvi Jaiswal: इकडं आयपीएलमध्ये वैभवमुळे संपूर्ण झाकोळला अन् तिकडं इंग्लंड दौऱ्यात संघात स्थान सुद्धा नाही! यशस्वी जैस्वालच्या दुर्दैवाचा फेरा
इकडं आयपीएलमध्ये वैभवमुळे संपूर्ण झाकोळला अन् तिकडं इंग्लंड दौऱ्यात संघात स्थान सुद्धा नाही! यशस्वी जैस्वालच्या दुर्दैवाचा फेरा
Sachin Tendulkar Lagaan: आमिर खानच्या 'लगान'शी सचिन तेंडुलकरचं खास कनेक्शन, 25 वर्षांनी सांगितला भन्नाट किस्सा; VIDEO शेअर, 'या' गाण्याचं केलं कौतुक
आमिर खानच्या 'लगान'शी सचिन तेंडुलकरचं खास कनेक्शन, 25 वर्षांनी सांगितला भन्नाट किस्सा; VIDEO शेअर, 'या' गाण्याचं केलं कौतुक
India ODI Squad vs England : टीम इंडियात मोठे फेरबदल; मागील मालिकेतील 6 धुरंधर खेळाडू बाहेर, बुमराहचं कमबॅक, पण विराटचं काय?
टीम इंडियात मोठे फेरबदल; मागील मालिकेतील 6 धुरंधर खेळाडू बाहेर, बुमराहचं कमबॅक, पण विराटचं काय?

व्हिडीओ

Omraje Thackeray: ठाकरेंचा फोन, ओमराजे म्हणाले, तुम्हीच मोठं केलंय, मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही
Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?
Raj Thackeray speech : ठाकरेंचे खासदार शिंदेंसोबत का गेले, सर्वात मोठा दावा, UNCUT SPEECH
Sushma Andhare On Krishna Ashtikar : कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव- सुषमा अंधारे
Omraje Nimbalkar : होय, भावनिकदृष्ट्या मी चुकलोय, पण राजकीयदृष्ट्या माझा निर्णय योग्यच; ओमराजे निंबाळकरांनी मौन सोडलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sri Lanka A vs India A, Final: भारत 'अ' संघाने श्रीलंका 'अ' संघाला 66 धावांनी पराभूत करून तिरंगी मालिका जिंकली; वैभव सूर्यवंशीचा जाळ अन् धूर संगटच, 20 वर्षांपूर्वीचा पराक्रम मोडीत
भारत 'अ' संघाने श्रीलंका 'अ' संघाला 66 धावांनी पराभूत करून तिरंगी मालिका जिंकली; वैभव सूर्यवंशीचा जाळ अन् धूर संगटच, 20 वर्षांपूर्वीचा पराक्रम मोडीत
Yashasvi Jaiswal: इकडं आयपीएलमध्ये वैभवमुळे संपूर्ण झाकोळला अन् तिकडं इंग्लंड दौऱ्यात संघात स्थान सुद्धा नाही! यशस्वी जैस्वालच्या दुर्दैवाचा फेरा
इकडं आयपीएलमध्ये वैभवमुळे संपूर्ण झाकोळला अन् तिकडं इंग्लंड दौऱ्यात संघात स्थान सुद्धा नाही! यशस्वी जैस्वालच्या दुर्दैवाचा फेरा
सी-फूड निर्यात कारखान्यात अमोनिया वायूची गळती; अवघ्या पंचविशीतील 7 महिलांचा तडफडून मृत्यू; 65 हून अधिक जखमी, 9 जण व्हेंटिलेटरवर
सी-फूड निर्यात कारखान्यात अमोनिया वायूची गळती; अवघ्या पंचविशीतील 7 महिलांचा तडफडून मृत्यू; 65 हून अधिक जखमी, 9 जण व्हेंटिलेटरवर
मुंबईत अवघ्या दोन मिनिटांच्या उशिराने विद्यार्थ्यांचे वर्ष वाया, परीक्षेला बसू न दिल्याने रडू कोसळले; पोलिस बंदोबस्तात 'नीट' परीक्षा
मुंबईत अवघ्या दोन मिनिटांच्या उशिराने विद्यार्थ्यांचे वर्ष वाया, परीक्षेला बसू न दिल्याने रडू कोसळले; पोलिस बंदोबस्तात 'नीट' परीक्षा
Sangli Satara : सांगली- साताऱ्यात महायुती आणि मविआत सामना, मतदारांचा कौल कोणाला? विधानपरिषद निवडणुकीत कोण बाजी मारणार?
मागील निवडणुकीत सांगली साताऱ्यात धक्कादायक निकाल, यावेळी विधानपरिषदेवर कोण जणार? उद्या निकाल
शक्तीपीठ बोकांडी मारत आहेत, 56 टक्के दिल्याशिवाय बिल मिळेना, गृह खात्याचा कारभार बघितला; सतेज पाटील आणि जयंत पाटलांचा महायुती सरकावर थेट हल्लाबोल
शक्तीपीठ बोकांडी मारत आहेत, 56 टक्के दिल्याशिवाय बिल मिळेना, गृह खात्याचा कारभार बघितला; सतेज पाटील आणि जयंत पाटलांचा महायुती सरकावर थेट हल्लाबोल
अमेरिका-इराण चर्चेवर शंका! परस्परविरोधी दाव्यांमुळं खळबळ, होर्मुझची सामुद्रधुनी बंद की सुरु?
अमेरिका-इराण चर्चेवर शंका! परस्परविरोधी दाव्यांमुळं खळबळ, होर्मुझची सामुद्रधुनी बंद की सुरु?
EPFO :  पीएफ खात्यातून आपत्कालीन स्थितीत 100 टक्के की 75 टक्के रक्कम काढता येणार? नवा नियम नेमका काय?
पीएफ खात्यातून आपत्कालीन स्थितीत 100 टक्के की 75 टक्के रक्कम काढता येणार? नवा नियम नेमका काय?
Embed widget