एक्स्प्लोर
पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरचे सेहवागला अपशब्द, मनोज तिवारीचं उत्तर
मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताकडून झालेल्या लाजीरवाण्या पराभवातून पाकिस्तान अजूनही सावरलेला नाही. पाकिस्तानचे माजी विकेटकीपर राशिद लतीफ यांनी वीरेंद्र सेहवागविरोधात अपशब्द वापरले. आता भारताचा युवा क्रिकेट मनोज तिवारीने राशिद लतीफ यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.
मनोज तिवारीने राशिद लतीफ यांना खडेबोल सुनावले आणि यापुढे शब्दांचा वापरता करताना काळजी घ्या, असा इशाराही दिला.
ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करुन मनोज तिवारी म्हणाला की, "राशीद लतीफ 60 सेकंदांच्या स्वस्त लोकप्रियतेसाठी सेहवागबाबत अशा शब्दांचा वापर करत आहेत. त्यांना फार महत्त्व देण्याची गरज नाही. सेहवागचे विक्रम इंग्लिशमध्ये आहेत, त्यामुळे राशिद लतीफ यांना कोणीतरी अनुवाद करुन समजावलं पाहिजे. तुम्ही ज्या सेहवागबद्दल बोलताय, त्याच्या जवळही पोहोचू शकत नाही. तुमच्या ज्या मित्राला इंग्लिश समजतं त्याला सांगा की, मला सेहवागचा विक्रम हिंदीत अनुवाद करुन समजाव."
नातवानंतर मुलगा. काही हरकत नाही मुलांनो, चांगले खेळलात. भारताचं अभिनंदन #BaapBaapHotaHai #INDvPAK', असं ट्वीट वीरेंद्र सेहवागने पाकिस्तानवर 124 धावांच्या विजयानंतर केलं होतं.
https://twitter.com/virendersehwag/status/871425942614298624
यावर राशिद लतीफ यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करुन वीरेंद्र सेहवाला अपशब्द वापरले होते.
https://twitter.com/iamRashidLatif/status/873287137013018624
यानंतर मनोज तिवारीने व्हिडीओद्वारे राशिद लतीफ यांना उत्तर दिलं आहे. 'हा व्हिडीओ मेसेज एका मुर्खासाठी आहे, ज्याचं नाव राशिद लतीफ आहे. तुम्ही अतिशय बेशरम व्यक्ती आहात. तोंड पाहिलंय का तुमचं? तोंड काळं करुन फिरताय. तुम्हाला लाज-शरम नाही. जे दोन-चार खेळाडू तुम्हाला पाहून, तुमची विकेटकीपिंग पाहून शिकतात, ते लक्षात घेऊन तरी यापुढे अशाप्रकारचा व्हिडीओ रेकॉर्ड करु नका. हा व्हिडीओ पाहून तुमची चपलेने धुलाई करायला हवी.
https://twitter.com/tiwarymanoj/status/873956688289603584
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement