एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Majha Maharashtra majha vision : खेळाडूंसाठी परिपूर्ण सिस्टीम तयार करणे गरजेचे : अंजली भागवत

प्रत्येक राज्यात खेळाडूंसाठी क्रीडा विद्यापीठ उभारण्याची गरज असल्याचं माजी आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत म्हणाल्या. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझी जबाबदारी या कार्यक्रमात बोलत होत्या.

मुंबई : 75 वर्षानंतर ऑलिम्पिक चांगल गाजलं आहे. आपल्या खेळाडूंनी खूप चांगली कामगिरी केली आहे. मल्टी स्पोर्ट नेशन म्हणून या वर्षी आपण उतरलो. खेळाडूंनी आपल्या मेहनतीवर नैपुण्य दाखवले आहे. काहींची पदकं ही थोडक्यात हुकली पण तरी सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. खेळाडूंवर टीका करण्यापेक्षा ही  उंची गाठायला इतके वर्ष का लागले?  सिस्टीम म्हणून कुठे कमी पडलो यांची विचार करण्याची गरज आहे. याचा विचार करणे सध्या गरजेचे असल्याचं मत माजी आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत यांनी व्यक्त केले.  एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझी जबाबदारी या कार्यक्रमात बोलत होत्या. 

महाराष्ट्रातील खेळाडू मागे पडत असल्याची खंत

भारतीय म्हणून गर्व आहे. वेगवेगळ्या खेळात खेळाडूंनी प्रदर्शन केले. काही पदक थोडक्यात हुकली आहे. महाराष्ट्रासीठी विचार केला तर आपले खेळाडू  काही वर्षात मागे पडत केले. या मागे विचार करणे अपेक्षित आहे. इतर राज्यांच्या तुलनेच महाराष्ट्रातील खेळाडू ऑल्मिपिकमध्ये पोहचण्यासाठी कुठेतरी मागे पडत आहे याची खंत वाटत असल्याचं देखील अंजली भागवत यांनी म्हटलं आहे. 

क्रीडा विद्यापीठ उभारली पाहिजे

क्रिकेटशिवाय इतर खेळांच्या बातम्यांचे प्रसारण कमी होते. त्यामुळे आपल्याकडे इतर खेळांबद्दल लोकांमध्ये ऋची कमी आहे. प्रसारमाध्यमे, वर्तमानपंत्रांनी जर खेळ लोकांपर्यंत पोहचवला तर जास्तीत  जास्त लोक यामध्ये सहभागी होतील. त्यासाठी प्रत्येक राज्याची स्पोर्टची टाऊनशीप असणे गरजेचे आहे.  क्रीडा विद्यापीठ उभारण्याची गरज असल्याचं त्या या वेळी म्हणाल्या.

मनी कॅन नॉट बाय यु मेडल सिस्टम गिव्हस यु अ मेडल

अंजली भागवत म्हणाल्या,  नेमबाजांवर अपेक्षांच ओझं वाढल आहे. ऑलिम्पिकच्या तयारीसाठी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे. त्या सर्व गोष्ट सरकारने आणि फेडरेशनने दिल्या. पहिल्या पाच रँकिंगमध्ये आपले खेळाडू आहे. नुसती चर्चा आणि वाद घालण्यापेक्षा त्यांनी जबाबदारी  घेऊन त्यांना सुविधा दिल्या पाहिजे. ऑलिम्पिक हे वेगळं जग असते. तुमची मानसिकता झाली आहे का हे गरजेचे आहे. ऑलिम्पिक हा माईंड गेम आहे. 'मनी कॅन नॉट बाय यु मेडल सिस्टम गिव्हस यु अ मेडल' जी काही सिस्टम आपल्याकडे त्यामध्ये सराव करून आपल्या खेळाडूंनी पदक मिळवलं आहे.त्यासाठी सिस्टीम परिपूर्ण असणे आवश्यक आहे. ऑलिम्पिक  हे अल्टीमेट ड्रीम असते. प्रत्येक खेळाडूसाठी ती संधी असते. 

खेळाला प्राधान्य दिले पाहिजे

अंजली भागवत म्हणाल्या,  मी ज्यावेळी करिअर सुरू केलं. तेव्हाचा काळ वेगळा होता. सध्याचा काळ वेगळा आहे. सध्या खेळांविषयी लोकांमध्ये जागृकता आहे. समाजामध्ये खेळाविषयी जागृकता आली आहे पण प्राधान्य दिले जात नाही. खेळ लोकांपर्यंत पोहचला आहे. परंतु करिअरच्या संधी कमी असल्याने खेळाला प्राधान्य कमी दिले जाते. 

प्रत्येक खेळाडूच्या मागे एक संघर्ष आहे. कुटुंबाचा पाठींबा गरजेचा आहे.  इंटरनॅशल मेडलमध्ये मुलींची टॅली ही सर्वात जास्त आहे. आतापर्यंत खेळात मुलींची कारकिर्द पाहिली तर मुलींची ही ताकद स्वयंपाकघरात कोंडून ठेवू नका. त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेळ द्या असे देखील भागवत म्हणाल्या.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 7 PM : 01 डिसेंबर 2024 : ABP MajhaRohit Patil Update : रोहित पाटील यांची शरद पवार पक्षाच्या मुख्य प्रतोद पदी नियुक्ती #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7PM 01 December 2024Yugendra Pawar On EVM : युगेंद्र पवारांचा मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज, काय म्हणाले? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
Embed widget