एक्स्प्लोर
‘जहां जनता, वहां हम’, महेंद्रसिंग धोनीचा राजकीय अवतार वायरल
महेंद्रसिंग धोनी फॅन्स या ऑफिशीअल पेजवरुन हा फोटो ट्विट करण्यात आला आहे. 'जहां जनता,वहां हम' या आशयाच्या मथळ्याने हा फोटो शेअर केला आहे.
मुंबई : माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हे असे नाव आहे जे काहीही करु शकते. साधा हेअरकट असो किंवा लष्कराच्या छावणीत बूट पॉलिश करणे असो. धोनी आपल्या या हटके अंदाजांमुळेच चर्चेचा विषय ठरला आहे. मुंबईत पार पडलेल्या एका फोटोशूटमध्ये धोनी नव्या लूकमध्ये पाहायला मिळाला.
धोनी या नव्या लुकमध्ये राजकीय अवतार पाहायला मिळणार. सध्या धोनीच्या या नव्या लूकची जोरदार चर्चा सुरु आहे. या नवीन लूकमधील धोनी सध्या चांगलाच वायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. धोनीने या फोटोत मोदी जॅकेटसह सदरा-पायजमा घातला आहे. तसेच धोनीने डोक्यावर सफेद रंगाची नेहरु टोपी देखील परिधान केली आहे.
महेंद्रसिंग धोनी फॅन्स या ऑफिशीअल पेजवरुन हा फोटो ट्विट करण्यात आला आहे. 'जहां जनता,वहां हम' या आशयाच्या मथळ्याने हा फोटो शेअर केला आहे. धोनीच्या या नव्या लुकमुळे त्याच्या राजकारणात प्रवेश करण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. जम्मू-काश्मीरमधून घरी परतल्यानंतर धोनी मुंबईत याच नव्या लूकसाठीच्या फोटोशूटसाठी व्यस्त असण्याचे दिसून आलं.
यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सैन्याच्या वर्दीत दिसला होता. धोनीने जम्मू काश्मीरमध्ये पॅरा रेजिमेंटच्या 106 पॅरा टेरिटोरियल आर्मी बटलियनचा भाग बनत काश्मीरमध्ये प्रशिक्षण घेतलं. हे युनिट व्हिक्टर फोर्सचा भाग आहे. या ट्रेनिंगदरम्यान धोनी पेट्रोलिंग, गार्ड आणि पोस्टची ड्यूटी केली. यावेळी भारतीय जवान त्याच्यासोबतच होते. 2019 च्या विश्वचषकानंतर धोनी क्रिकेटला अलविदा करेल असी चर्चा रंगली होती. परंतु सैन्यात काम करण्याची इच्छा असल्याची विनंती धोनीने केली होती. सैन्याने त्याची विनंती मान्य केली आणि तो सीमेवर जाऊन देखील आला. दरम्यान, धोनीने आतापर्यंत 350 वनडे आणि 98 ट्वेण्टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 10 हजार 773 धावांची नोंद आहे.Jaha Janta, Waha hum 🤣😂@msdhoni donning new avatar for a shoot in Mumbai!❤#MSDhoni #Dhoni #ShootDiary pic.twitter.com/VMv0CPOO4d
— MS Dhoni Fans Official (@msdfansofficial) August 21, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
बीड
व्यापार-उद्योग
Advertisement