एक्स्प्लोर

State Wrestling Association : शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त, भारतीय कुस्ती संघटनेचा निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे. भारतीय कुस्ती संघटनेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

Maharashtra State Wrestling Association: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे. भारतीय कुस्ती संघटनेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. हा शरद पवार यांना धक्का मानला जात आहे. महासंघाच्या सुचनांनुसार 15 आणि 23 वयोगटातील कुस्ती स्पर्धांचे आयोजन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेनं न केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे.

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद ही भारतीय कुस्ती संघटनेकडून बरखास्त करण्यात आली आहे. दिल्लीत झालेल्या संघटनेच्या वार्षिक सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी काही दिवसात हंगामी समितीची निवड होईल अशी माहिती मिळत आहे. जिल्हा संघटना आणि काही पैलवानांकडून आलेल्या तक्रारींमुळे ही कारवाई झाल्याची माहिती मिळत आहे.

बाळासाहेब लांडगे यांच्या कारभाराविरुद्ध तक्रार बाळासाहेब

भाजपचे खासदार बृजभुषण सिंग हे भारतीय कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत. तर विनोद तोमर हे सचिव आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे शरद पवार हे अध्यक्ष आहेत तर बाळासाहेब लांडगे हे 40 वर्षांहून अधिक काळ सचिव आहेत. बाळासाहेब लांडगे यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध काही दिवसांपुर्वी पुण्यात पैलवानांनी आंदोलन देखील केलं होतं. भारतीय कुस्ती महासंघाकडं तक्रार देखील करण्यात आली होती. या बरखास्तीनंतर नव्यानं निवडणूक घेऊन भारतीय कुस्तीगीर परिषद गठीत करण्यास सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्रात महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे करण्यात येते.

शरद पवार यांचे बृजभुषण सिंग यांच्या चांगले संबंध, तरीही कारवाई

शरद पवार आणि भारतीय कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष बृजभुषण सिंग यांचे चांगले संबंध आहेत. तरी देखील महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्यानंतर बृजभुषण सिंग हे चांगलेच चर्चेत आले होते. कारण बृजभुषण सिंग यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध केला होता. उत्तर भारतीयांची राज ठाकरेंनी माफी मागावी आणि मगच अयोध्येत यावं अशी भूमिका त्यांनी घेतली होती. या भूमिकेमुळं बृजभुषण सिंग हे चर्चेत आले होते. दरम्यान, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेविरोधात विविध तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.   

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09 PM  05 July 2024 TOP HeadlinesABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 05 July 2024PM Modi meet Team India:मातीची चव कशी होती?कॅच कसा घेतलास?मोदींची प्रत्येक खेळाडूशी चर्चा UncutCNG Bike | जगातली पहिली CNG बाईक पाहिलीत का? 330 किलीमीटरचं मिळतोय मायलेज!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
Embed widget