Argentina's Lionel Messi : अर्जेंटीनाचा स्टार फुटबॉलर लियोनेल मेस्सीनं पुन्हा एकदा 'बॅलन डी'ओर अवॉर्ड जिंकला आहे. मेस्सीनं अवॉर्ड रेकॉर्ड सातव्यांदा आपल्या नावे केला आहे. 34 वर्षांच्या मेस्सीनं पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर ख्रिस्तायानो रोनाल्डो आणि बायर्न म्यूनिखचा स्टार रॉबर्ट लेवानडॉस्कीला मागे टाकत हा अवॉर्ड आपल्या नावे केला आहे. यापूर्वी मेस्सीनं 2009, 2010, 2011, 2012, 2015 आणि 2019 मध्ये 'बॅलन डी'ओर अवॉर्ड जिंकला होता. 


मेस्सीनंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोनं सर्वाधिक वेळा 'बॅलन डी'ओर आपल्या नावे केलं आहे. रोनाल्डोनं 2008, 2013, 2014, 2016, 2017 मध्ये 'बॅलन डी'ओर आपल्या नावे केला आहे. याव्यतिरिक्त जोहान क्रायफ, माइकल प्लातिनी, मार्को वान बास्टननं 3-3 वेळा आणि फ्रेंच बेकेनबाउर, रोनाल्डो नाजारियो, अल्फ्रेडो डी स्टेफनो, केविन कीगन, कार्ल हेन्ज यांनी प्रत्येकी 2-2 वेळा 'बॅलन डी'ओर पटकावला आहे. 



Ballon d'Or काय आहे? 


Ballon d'Or अवॉर्ड फ्रांसमधील फुटबॉल मासिक बॅलन डिओरच्या वतीनं देण्यात येतो. क्लब आणि राष्ट्रीय संघातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. याची सुरुवात 1956 साली झाली, जेव्हा हा पुरस्कार स्टॅनले मॅथ्यूज यांना पहिल्यांदा देण्यात आला होता. तेव्हापासून हा अवॉर्ड दरवर्षी दिला जातो. तीन वर्षांपूर्वी म्हणजेच, 2018 पासून महिला फुटबॉलपटूंनाही हा पुरस्कार देण्यात येतो. 



'बॅलन डी'ओर पुरस्कार वर्षातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूला दिला जातो. जगभरातील पत्रकार आणि चाहते या पुरस्कारासाठी त्यांच्या आवडत्या खेळाडूला मतदान करतात. या आधारावर विजेत्याची निवड केली जाते. हा पुरस्कार 1856 पासून दरवर्षी जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूला दिला जात आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :