Junior Hockey World Cup : भारतीय हॉकी संघानं ओदिशामध्ये सुरु असलेल्या ज्युनिअर हॉकी वर्ल्ड कपच्या क्वॉर्टर फायनलमध्ये आपली जागा पक्की केली आहे. पूल-बीमधील आपल्या तिसऱ्या सामन्यात भारतानं पोलंडला 8-2 अशा फरकानं हरवलं. भारतीय हॉकी संघातील युवा खेळाडू संजय, हुंडल अरइजीत सिंह आणि सुदीप चिरमाको यांनी प्रत्येकी 2-2 गोल डागले. 


स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात फ्रान्सकडून पराभव पत्करल्यानंतर भारताला क्वॉर्टर फायनल्समध्ये आपलं स्थान पक्क करण्यासाठी उर्वरित दोन सामने जिंकणं गरजेचं होतं. भारतानं ग्रुपच्या दुसऱ्या सामन्यात कॅनडाला 13-1 च्या फरकानं पराभूत करुन क्वॉर्टर फायनल्समध्ये आपली जागा पक्की केली आहे. पोलंड विरुद्धच्या सामन्यात भारतासमोर करो या मरोची परिस्थिती होती. 



भारताच्या तीन खेळाडूंनी डागले प्रत्येकी दोन गोल 


भारतीय संघ सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी करताना दिसून आला. सामन्याच्या चौथ्या मिनिटाला भारतीय संघानं लीड घेतली. पूलमधील सुरुवातीचे दोन सामन्यांमध्ये भारताच्या वतीनं हॅट्रिक करणाऱ्या संजयनं आजच्या सामन्यात 2 गोल डागले. भारतासाठी सर्वात पहिला गोल संजयनंच डागला. कॅनडाच्या विरोधात हॅट्रिक करणाऱ्या हुंडालनंही या सामन्यात 2 गोल डागले. याव्यतिरिक्त सुदीप चिरमाकोनेही 2 गोल डागले. भारतासाठी उत्तम सिंह आणि  शारदानंद तिवारी यांनी प्रत्येकी 1-1 गोल डागला. 


भारताचा पुढचा सामना बेल्जियमशी 


ज्युनिअर हॉकी वर्ल्ड कपच्या क्वॉर्टर फायनलमध्ये भारताची लढत बेल्जियमशी होणार आहे. हा सामना एक डिसेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. बेल्जियम गेल्या ज्युनिअर हॉकी वर्ल्डकपमध्ये उपविजेता संघ होता. भारतीय संघाचं बेल्जियमला फायनल्समध्ये पराभूत केलं होतं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :