मुंबई : केंद्र सरकार महाराष्ट्राला लस देण्यात नेहमीच दुजाभाव करत असल्याची टीका महाविकास आघाडीचे नेते नेहमीच करताना पाहायला मिळाले. मात्र राज्याकडे आता मुबलक लस उपलब्ध असताना ही लसीकरणाचा आकडा वाढताना दिसत नाही. त्यामुळे लसीकरणावरुन राजकारण सुरु होत का? असा प्रश्न समोर येतोय. त्यामुळे राज्यातील नागरीकांचे लसीकरण करण्यात राज्य सरकार अपयशी ठरतय का? असा प्रश्न समोर येत आहे. दोन डोस घेतलेल्याचा आकडा मुंबईत सर्वाधिक आहे. मात्र मुंबईतील काही आकडेवारी पाहिली तर धक्कादायक आहे. एकट्या मुंबईत 94 हजार फ्रंटलाईन वर्कर्सचा लसीचा दुसरा डोस अद्यापही बाकी आहे. राज्यातही दुसरा डोस चुकवणारे किमान 92 लाख फ्रंटलाईन वर्कर शिल्लक आहेत.
काय आहे मुंबईतील लसीकरणाची आकडेवारी?
मुंबईतील 27 नोव्हेंबर 2021 च्या लसीकरणाच्या आकडेवारीनुसार 4 लाख 25 हजार 464 कर्मचाऱ्यांनी पहिली मात्रा घेतली आहे. तर 3 लाख 31 हजार 075 कर्मचाऱ्यांनी दुसरी मात्रा घेतली आहे. परंतु अद्यापही 94 हजार कर्मचाऱ्यांनी दुसरी मात्रा घेतलेली नाही. मुंबईत आजवर 1 कोटी 57 लाख 33 हजार 818 लसीकरण पार पडले असून यामध्ये 64 लाख 42 हजार 126 लोकांनी दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. तर 92 लाख 91 हजार 692 लोकांनी पहिली मात्रा घेतली आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात 80 टक्के लोकांनी कोरोनाविरोधी लशीचा पहिला डोस घेतलाय. तर, लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या मात्र, फक्त 40 टक्केच आहे. ज्या मुंबईतून राज्याचा गाडा हाकला जातो त्या ठिकाणची ही परिस्थिती आहे. एवढच नाहीतर सर्व राज्याची कोविड संदर्भात निर्णय याच ठिकाणाहून घेतले जातात. या ठिकाणी ही लसीकरणाची ही परिस्थिती अशाी आहे. राज्यातील परिस्थिती ही काही वेगळी नाही.
काय आहे राज्यातील लसीकरणाची परिस्थिती?
- सोलापूर जिल्हात सर्वाधिक कमी दोन डोस घेतलेल्यांची संख्या अवघी 24 टक्के आहे
- नांदेड आणि जळगाव प्रत्येकी 25 टक्के
- हिंगोली 26.37 टक्के
- उस्मानाबाद 27.39 टक्के
- बीड 28.68 टक्के
- यवतमाळ 28.79 टक्के
- अहमदनगर 28.97 टक्के
- औरंगाबाद 29.04 टक्के
- जालना 29.53 टक्के
- परभणी 29.73 टक्के
- तर सर्वाधिक लसीकरण मुंबईत 70.35 टक्के आहेत
- पुणे 57.47 टक्के
- भंडारा 54.80 टक्के
- सिंधुदुर्ग 53.81 टक्के
- गोंदिया 52.71 टक्के लसीकरण करण्यात आलं आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha