मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने नुकतीच टी20 संघाचं कर्णधारपद सोडलं. त्यानंतर पहिल्या कसोटीसाठीही तो विश्रांतीवर असल्याने संघात नाही. दुसरी कसोटी जी मुंबई येथे होणार आहे, त्यासाठी विराट सराव करत असून नुकतंच त्याने एक जीममधील व्हिडीओ त्याच्या Koo app वर पोस्ट केला आहे. सोबत त्याने हॉलीवूड अभिनेता डेंजल वॉशिंगटन याचा एक प्रेरणादायी संदेशही कॅप्शन म्हणून लिहिला आहे.
विराटने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो जबरदस्त जीम वर्कआऊट करत आहे. सोबतच त्याने 'कष्टाच्या जागी सहज काम, हा प्रगतीसाठी मोठा धोका' असं भन्नाट आणि प्रेरणादायी संदेशही लिहिला आहे. या व्हिडीओवर विराटचे चाहतेही लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडताना दिसत आहेत. दरम्य़ान विराटने लिहिलेलं कॅप्शन हे डेंजल वॉशिंग्टन याने 2017 मध्ये NAACP Image Awards मध्ये म्हटलं होतं.
दुसऱ्या कसोटीमध्ये विराटकडे सर्वांचे लक्ष
नुकतच टी20 संघाचं कर्णधारपद विराटने सोडल्यानंतर आता त्याचं अधिक लक्ष कसोटी क्रिकेटकडे असणार यात शंका नाही. दरम्यान विराटने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत विश्रांती घेतली असली तरी दुसऱ्या कसोटीत तो मैदानात कर्णधार म्हणून उतरणार आहे. त्यात दोन वर्षांपासून शतक न झळकावू शकलेला विराट या सामन्यात तरी कमाल करणार का? यासारख्या प्रश्नांसाठी विराटकडे सर्वांचे लक्ष आहे.
संबधित बातम्या
- IND vs NZ : श्रेयस अय्यरचं पदार्पणातच शतक, कर्णधारांची काळजी मात्र वाढली, नेमकं कारण काय?
- Cheteshwar Pujara On Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या फॉर्मबाबत चेतेश्वर पुजाराचं मोठं वक्तव्य, पाहा काय म्हणाला?
- IND vs NZ : भारतीय संघाला यष्टीरक्षकाचा नवा पर्याय, टी20 नंतर कसोटीमध्येही कमाल कामगिरी