एक्स्प्लोर
IPL: ...शेवटचे 12 चेंडू अन् मुंबईचा पराभव!
मुंबई: आयपीएलच्या 10 मोसमातील मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात काल (गुरुवार) मुंबईत झालेला सामना चांगलाच रंगतदार झाला. या सामन्यात पंजाबनं मुंबईला 7 धावांनी पराभूत करुन प्ले ऑफमध्ये जाण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
टॉस हरल्यानंतर पहिले फलंदाजी करणाऱ्या पंजाबनं रिद्धीमान साहा (93) याच्या फलंदाजीच्या जोरावर 230 धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईनं चांगलीच झुंज दिली. पण मुंबई 223 धावाच करु शकली.
डोंगराएवढ्या आव्हानाचा सामना करताना मुंबई नक्कीच विजय मिळवू शकेल अशी आशा सर्वांनाच वाटत होती. पण पंजाबनं शेवटच्या दोन ओव्हरमध्ये (12 चेंडू) मुंबईकडून सामना अक्षरश: खेचून घेतलं.
शेवटचे 12 चेंडू आणि पंजाबचा विजय:
मुंबईनं प्रचंड धावा केल्यानंतरही शेवटच्या दोन ओव्हरमध्ये मुंबईला आवश्यक असणाऱ्या धावा संदीप शर्मा आणि मोहित शर्मा या जोडगोळीनं करु दिल्या नाहीत.
18व्या ओव्हरनंतर सामना पूर्णपणे मुंबईच्या बाजूनं झुकला होता. मुंबईला 12 चेंडूत फक्त 23 धावा हव्या होत्या. त्यावेळी कर्णधार मॅक्सवेलनं संदीप शर्माला 19वी ओव्हर दिली. या ओव्हरमध्ये संदीप शर्मानं 6 चेंडूंपैकी 2 चेंडूवर एकही धाव घेऊ दिली नाही. त्याने या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा दिल्या. संदीपनं या ओव्हरमध्ये एकही चौकार दिला नाही. त्यामुळे मुंबईवर पुन्हा एकदा दबाव आला.
यानंतर शेवटच्या षटकात मुंबईला विजयासाठी 16 धावांची गरज होती. तेव्हा क्रीझवर धडाकेबाज पोलार्ड होता. तेव्हा कर्णधार मॅक्सवेलनं मोहित शर्मावर विश्वास दाखवत चेंडू त्यांच्याकडे सोपवला. मोहितनं पहिल्या चेंडूवर 1 धाव दिली. त्यानंतर पोलार्डनं दुसऱ्याच चेंडूवर थेट षटकार ठोकून मुंबईच्या विजयाच्या आशा पुन्हा पल्लवित केल्या. मुंबईला विजयासाठी 4 चेंडूत 9 धाव हव्या होत्या. पण पुढचे तीनही चेंडू मोहितनं अप्रतिम टाकले. या तीन चेंडूमध्ये मोहितनं पोलार्डला एकही धाव घेऊ दिली नाही. त्यामुळे पंजाबचा विजय निश्चित झाला.
संबंधित बातम्या:
पंजाब प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, मुंबईवर 7 धावांनी विजय
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement