एक्स्प्लोर
ईडन गार्डन्सवर लकमलची लकाकी, 6 षटकं, 6 निर्धाव, 3 विकेट्स
श्रीलंकेच्या लकमलने लखाखती कामगिरी केली. 6 षटकांमध्ये 6 निर्धाव आणि 3 विकेट्स घेतल्या. त्यामुळे आजच्या दिवसाचा लकमल हिरो ठरला.
कोलकाता : कोलकात्याच्या पहिल्या कसोटीत पाऊस आणि अंधुक प्रकाशामुळे केवळ अकरा षटकं आणि पाच चेंडूंचाच खेळ होऊ शकला. पण त्या कालावधीतही श्रीलंकेने टीम इंडियाची तीन बाद 17 अशी दाणादाण उडवली आहे.
श्रीलंकेच्या लकमलने लखाखती कामगिरी केली. 6 षटकांमध्ये 6 निर्धाव आणि 3 विकेट्स घेतल्या. त्यामुळे आजच्या दिवसाचा लकमल हिरो ठरला.
लोकेश राहुल, शिखर धवन आणि विराट कोहली या तिन्ही फलंदाजांना लकमलने एकही धाव न मोजता माघारी धाडलं. त्याचं पृथक्करण होतं सहा षटकं, सहा निर्धाव, एकही धाव न देता तीन विकेट्स.
दरम्यान, पंचांनी पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला, त्या वेळी चेतेश्वर पुजारा 8 धावांवर, तर अजिंक्य रहाणे शून्यावर खेळत होता.
श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज सुरंगा लकमलने ढगाळ हवामान आणि अनुकूल खेळपट्टीचा लाभ उठवून भारताच्या प्रमुख फलंदाजांची फळी कापून काढली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
क्राईम
करमणूक
Advertisement