Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथील निकिता सुशील कमलाकरने आशियाई यूथ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक पटकावले आहे. उजबेकिस्तानमध्ये ही स्पर्धा सुरू असून निकिताच्या यशामुळे कोल्हापूरचे नाव पुन्हा एकदा साता समुद्रापार पोहोचले आहे. 


अत्यंत प्रतिकूल परस्थितीमध्ये निकीताने पदकाला गवसणी घातली आहे. निकिताने एक महिन्यांपूर्वी मेक्सिकोमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र, तिला पदकाने हुलकावणी दिली होती. मात्र आता मुलीच्या यशाने कुटुबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. 


रौप्यपदक विजेत्या निकिताच्या घरची परिस्थिती अगदी बेताची आहे. तिचे वडील दोन्ही पायांनी अपंग असून त्यांचा चहा विक्रीचा व्यवसाय आहे. शाळा, बँक, कार्यालयामध्ये सायकलने जाऊन ते चहा विक्री करतात. निकिताची आई दत्त साखर कारखान्यातील दवाखान्यात नर्स म्हणून काम करते.


निकिताने 55 किलो वजनी गटात 67 किलो स्नॅक आणि 95 किलो क्लीन अँन्ड जर्क असे एकूण 163 किलो वजन उचलून रौप्य पदक पटकावले. निकिताच्या या यशात कुटुंबाबरोबर प्रशिक्षकांनी खूप मेहनत घेतली. विजय माळी यांनी निकिता पाचवीत असल्यापासून तिला वेटलिफ्टिंगचे धडे दिले आहेत. निकिता सध्या बारावीमध्ये शिकत आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या