Pune Crime News: आमदार माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे या राज्यातील चार महिला आमदारांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल केला होता. महिला आमदारांची फसवणूक करणाऱ्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. मुकेश राठोड असं या आरोपीचं नाव आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आई आजारी होती म्हणून एका अज्ञात व्यक्तीने या महिला आमदारांना मदत मागितली होती. मदत म्हणून ती रक्कम ऑनलाइन माध्यमातून देण्यात आली होती. मात्र तो फेक कॉल होता असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यानंतर आमदारांनी तक्रार दिली. त्या नुसार पुण्यातील बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस त्या अज्ञात आरोपीचा शोध घेत होते. अखेर दोन दिवसांनी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
मला या माणासचा फोन आला होता. त्याला मदत करण्यासाठी त्याने ऑनलाईन स्कॅनर पाठवलं होतं. कोणत्याच स्कॅनरवर सुरुवातील पैसे जात नव्हते त्याने पर्यायी नंबर पाठवला. त्यावर मी पैसे पाठवले होते. आई आजारी आहे असं त्याने मला सांगितलं होतं. शिवाय मेडिकलच्या माणसाशीदेखील माझं बोलणं करुन दिलं होतं. त्यामुळे मी पैसे दिले होते. एका बैठकीसाठी ज्यावेळी आम्ही सगळ्या महिला आमदारांची भेट झाली त्यावेळी सगळ्यांनी हा प्रकार मला बोलून दाखवला. त्यानंतर आमची फसवणूक झाल्याचं समोर आलं. आम्ही तातडीने पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार केली होती, असं भाजप आमदार माधुरी मिसाळ यांनी सांगितलं.
आमच्याकडे रोज अनेक लोक मदतीसाठी येतात. अनेकांना शालेय वस्तू हव्या असतात तर अनेकांना वैद्यकीय कारणासाठी पैसे हवे असतात. आम्ही त्या व्यक्तीची शाहनिशा करतो. व्यक्तीच्या हाती पैसे सोपवत नाही तर त्या मेडिकल किंवा दुकानदाराला थेट पैसे देतो. मात्र यावेळी तातडीने पैसे हवे आहेत, असं सांगितल्याने आम्ही ऑनलाईन पैसे पाठवले. या सगळ्यात प्रामाणिक माणसाता तोटा होण्याची शक्यता जास्त आहे. गरजूंना मदत करताना 10 वेळा विचार केला जाईल, असंही त्या म्हणाल्या.