एक्स्प्लोर
न्यूझीलंडच्या कोचकडून विराटच्या द्विशतकीय खेळीचं कौतुक

इंदूरः टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या द्विशतकीय खेळीचं न्यूझीलंडचे प्रशिक्षक माईक हेसन यांनी कौतुक केलं. विराटच्या खेळीमुळे इंदूर कसोटी न्यूझीलंडच्या हातातून निसटण्यास मदत झाली, असं हेसन म्हणाले. भारतीय संघाकडून चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. न्यूझीलंडने आखलेल्या रणनिती प्रमाणेच गोलंदाजी केली. मात्र भारताने न्यूझीलंडची रणनिती अयशस्वी ठरवली, असं हेसन यांनी सांगितलं. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. विराट कोहलीने 211 धावांची धावसंख्या उभारत कर्णधार म्हणून नवा विक्रम नावावर केला. दोन द्विशतकं ठोकणारा विराट पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी विराटने वेस्ट इंडिजविरुद्ध द्विशकीय खेळी केली होती.
संबंधित बातमीः इंदूर कसोटीः न्यूझीलंडच्या दुसऱ्या दिवसअखेर बिनबाद 28 धावा
आणखी वाचा























