KKR vs CSK, 1st Innings Score: चेन्नईचा कोलकात्यासमोर धावांचा डोंगर, कोलकात्याला 221 धावांचं आव्हान
KKR vs CSK, IPL 2021 1st Innings Highlights:वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या आयपीएल सामन्यात चेन्नईने कोलकातासमोर 20 षटकात 3 बाद 220 धावा केल्या आहेत.
![KKR vs CSK, 1st Innings Score: चेन्नईचा कोलकात्यासमोर धावांचा डोंगर, कोलकात्याला 221 धावांचं आव्हान KKR vs CSK Score IPL 2021 Live Score Kolkata Knight Riders vs Chennai Super Kings first innings score highlights KKR vs CSK, 1st Innings Score: चेन्नईचा कोलकात्यासमोर धावांचा डोंगर, कोलकात्याला 221 धावांचं आव्हान](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/21/86cd06ba5a7099769878991a40cfc01e_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
KKR vs CSK, IPL 2021 1st Innings Highlights: : वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या आयपीएल सामन्यात चेन्नईने कोलकातासमोर 20 षटकात 3 बाद 220 धावा केल्या आहेत. चेन्नईकडून मराठमोळा ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु प्लेसिस यांनी धडाकेबाज सुरुवात करत चेन्नईच्या धावसंख्येचा पाया रचला. पहिल्या 5 षटकात या दोघांनी चेन्नईच्या 44 धावा फलकावर लावल्या. ऋतुराज गायकवाडने आपले पाचवे अर्धशतक पूर्ण केले. आक्रमक झालेला ऋतुराज अर्धशतकानंतर बाद झाला. ऋतुराजने 6 चौकार आणि 4 षटकारांसह 64 धावांची खेळी केली.
ऋतुराज आणि डु प्लेसिसने पहिल्या गड्यासाठी 115 धावांची भागीदारी केली. ऋतुराज बाद झाल्यानंतर प्लेसिसने अर्धशतक पूर्ण केले. ऋतुराजनंतर मैदानात आलेल्या मोईन अलीने आक्रमक फलंदाजी करत छोटी का होईना पण धडाकेबाज खेळी केली. त्याने डु प्लेसिससोबत 26 चेंडूत अर्धशतकी भागीदारी रचली. कोलकाताचा फिरकीपटू सुनील नरिनला मोठा फटका खेळण्याच्या नादात तो यष्टिचीत झाला. मोईन अलीने 12 चेंडूत 25 धावा केल्या
मोईन अली बाद झाल्यानंतर मैदानात आलेला महेंद्रसिंह धोनी आज आक्रमक पाहायला मिळाला. त्यानं 8 चेंडूत 17 धावा केल्या शेवटच्या षटकात डु प्लेसिसने पॅट कमिन्सला 2 षटकार ठोकले. मात्र, त्याला शतक पूर्ण करता आले नाही. फाफ डु प्लेसिसने 60 चेंडूत 9 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 95 धावांची खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)