एक्स्प्लोर

Khelo India Para Games 2023 : महाराष्ट्राचा सुवर्ण षटकार, ॲथलेटिक्समध्ये पदकांची लयलूट, बॅडमिंटनमध्ये आरतीचे अपेक्षित सुवर्ण

Khelo India Para Games 2023 : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पात्रता सिद्ध केलेल्या दिलीप गावितसह भाग्यश्री जाधव, अभिषेक जाधव, अकुताई उलभगत, गीचा चव्हाण आणि बॅडमिंटनपटू आरती पाटील यांनी पहिल्या खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेत मंगळवारी सुवर्णपदकांची कमाई केली.

नवी दिल्ली :  पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पात्रता सिद्ध केलेल्या दिलीप गावितसह भाग्यश्री जाधव, अभिषेक जाधव, अकुताई उलभगत, गीचा चव्हाण आणि बॅडमिंटनपटू आरती पाटील यांनी पहिल्या खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेत मंगळवारी सुवर्णपदकांची कमाई केली. या सुवर्ण षटकाराने महाराष्ट्राने आपली सर्वसाधारण आगेकूचही कायम राखली. 

खेळाडूंचा उत्साह आणि त्यांची जिंकण्याची जिद्द पाहिल्यावर धडधाकट खेळाडू देखिल प्रेरित होतील अशी कामगिरी हे खेळाडू करत आहेत. पुण्याच्या मिनाक्षी जाधवने एकाच दिवशी दोन ब्राँझपदकांची कमाई केली. पहिल्या दिवशी २०० मीटर शर्यतीत तिसरे स्थान मिळविणाऱ्या ऋतुजाने आज टू -३८/४४ प्रकारात ४०० मीर शर्यतीतही ब्राँझपदक मिळविले. भाग्यश्री दिलीप आणि गीता यांच्या सुरेख कामगिरीमुळे महाराष्ट्राने ॲथलेटिक्समध्ये आज दिवसभरात आठ पदकांची कमाई केली. नाशिकच्या दिलीपने पुरुषांच्या टी ४७ प्रकारात ४०० मीटर शर्यत जिंकताना ५१.२२ सेकंद अशी वेळ दिली. स्पर्धेतील हे त्याचे दुसरे पदक ठरले. यापूर्वी पहिल्या दिवशी तो १०० मीटर शर्यतीत रौप्यपदकाचा मानकरी ठरला होता. अभिषेकने टी ३५ प्रकारातून २०० मीटर शर्यत २९.९२ सेकंदात जिंकताना सुवर्णयश मिळविले. 

भाग्यश्री चमकली

ॲथलेटिक्समध्ये भाग्यश्रीचे यश सर्वात उजवे ठरले. सलग दुसऱ्या दिवशी भाग्यश्रीने सुवर्णपदकाला गवसणी घातली. नांदेडच्या भाग्यश्रीने महिलांच्या गोळाफेक प्रकारात एफ ३२, ३३, ३४ विभागात ७.६० मीटर फेक करताना सुवर्णपदक मिळविले. भाग्यश्री पहिल्या दिवशी भालाफेक प्रकारातही सुवर्णपदकाची मानकरी ठरली होती. हे यश अवर्णनीय असून, भविष्यात कारकिर्द घडवताना हा सुवर्ण अनुभव निश्चित कामी येईल, असे भाग्यश्री म्हणाली. अकुताईने थाळीफेक प्रकारात रौप्यपदक मिळविले होते. मात्र, आज गुणांच्या आघाडीची पडताळणी झाल्यावर अकुताईचे रुपेरी यश सोन्यात परावर्तित झाले. मिनाक्षीने एफ ५६-५७ या प्रकारात फेक प्रकारात लागोपाठ दोन ब्राँझपदके मिळविली. प्रथम भालाफेक प्रकारात मिनाक्षीने १२.३५ मीटर फेक केली, तर गोळाफेक प्रकारात तिने ५.१६ मीटर फेक करून तिसरे स्थान मिळविले. 

नेत्रदिपक कामगिरी - सुहास दिवसे

आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव पणाला लावताना खेळाडूंनी पहिल्या पॅरा खेलो इंडिया स्पर्धेत केलेली कामगिरी विलक्षण असून, त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. खेळाडूंच्या कामगिरीने महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. अन्य खेलो इंडिया स्पर्धेतील महाराष्ट्राचे यश या पॅरा खेळाडूंच्या यशाने द्विगुणित झाले, अशा शब्दात क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांनी महाराष्ट्राच्या खेळाडूंचे कौतुक केले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | राज्याचं राजकारण कुठे चाललंय? राजकारणाची ही संस्कृती नाही? ABP MajhaLaxman Hake Car Vandalized : मराठा आंदोलकांनी फोडली लक्ष्मण हाकेंची कार, वातावरण तापलंRaj Thackeray Full Speech Ghatkopar : अपयशी ठरलो तर दुकान बंद करेन! राज ठाकरेंचं मतदारांना आवाहन...ABP Majha Marathi News Headlines 9 PM TOP Headlines 9 PM 07 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget