एक्स्प्लोर
146.8 च्या वेगाने गोलंदाजी, अंडर-19 विश्वचषकात नागरकोटीचा विक्रम
हा सामना पृथ्वी शॉच्या फलंदाजीसोबतच कमलेश नागरकोटीच्या वेगवान गोलंदाजीने गाजवला.

माऊंट मोंग्नुई (न्यूझिलंड) : पृथ्वी शॉच्या टीम इंडियाने अंडर-19 विश्वचषकात अपेक्षेप्रमाणे ऑस्ट्रेलियाला नमवत विजयी सलामी दिली. हा सामना पृथ्वी शॉच्या फलंदाजीसोबतच कमलेश नागरकोटीच्या वेगवान गोलंदाजीने गाजवला. 18 वर्षाच्या कमलेश नागरकोटीने या सामन्यात 140 किमी प्रतितास पेक्षाही अधिक वेगाने गोलंदाजी केली. त्याने 146.8 च्या वेगाने चेंडू अंडर 19 विश्वचषकात टाकला गेलेला हा दुसरा वेगवान चेंडू ठरला. याआधी वेस्ट इंडिजच्या अल्झारी जोसेफने अंडर 19 विश्वचषकात 147 किमी प्रती तास या वेगाने चेंडू टाकला होता. नागरकोटीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात 7 षटकात 29 धावा देताना ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना माघारी धाडत टीम इंडियाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवागनेही देखील कमलेशच्या या कामगिरीचं कौतुक केलं आहे. स्थानिक स्पर्धांमध्ये राजस्थानकडून खेळणाऱ्या कमलेश नागरकोटीने याआधी राजस्थानच्या सोळा आणि एकोणीस वर्षांखालील संघाचं प्रतिनिधीत्व केलं होतं. एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















