Mann Ki Baat LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमात मराठमोळ्या मयूर पाटील या तरुणाचं कौतुक केलं. तसेच त्यांनी मयूरशी संवाद देखील साधला. गाड्यांचा मायलेज वाढवणाऱ्या उपकरणाचा शोध मयूरनं लावला असून त्यानं त्याचं एक स्टार्टअप सुरु केलं आहे. Small Spark Concepts नावाची मयूरची कंपनी आहे. पंतप्रधान मोदींशी संवाद साधताना मयूरनं सांगितलं की, कॉलेजमध्ये असताना माझ्याकडे बाईक होती. तिचा मायलेज कमी होता आणि गाडीतून धूर खूप निघायचा. धूर कमी करण्यासाठी आणि मायलेज कमी करण्यासाठी मी प्रयत्न केला. आणि माझा तो प्रयत्न यशस्वी ठरला. त्यानंतर आम्ही मोठ्या प्रमाणावर यावर काम करायचं ठरवलं. याचं पेटंट देखील आम्हाला मिळालं आहे, असं मयूरनं सांगितलं. त्यानंतर भारत सरकारकडून मिळालेल्या मदतीनं आम्ही कंपनी सुरु केली, असं त्यानं सांगितलं. 


Mann Ki Baat : ऑस्ट्रेलिया आणि बुंदेलखंडच्या झाशीचं एक वेगळं नातं : पंतप्रधान मोदी 


यावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, या शोधामुळं खर्च देखील कमी केला आहे. सोबत पर्यावरणासाठी देखील मोठं काम केलं आहे. त्यामुळं त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. Start-Upsच्या माध्यमातून भारतीय युवा जागतिक समस्येवर तोडगा काढण्यात आपलं योगदान देत आहेत, असं ते म्हणाले. 


पंतप्रधान म्हणाले की, ‘Unicorn’ एक असा Start-Up असतो ज्याचं मूल्य किमान 1 अब्ज डॉलर असतं म्हणजे अंदाजे सात हजार कोटी रुपयांहून अधिक असतं. 2015 पर्यंत देशात मोठ्या मुश्किलीनं नऊ किंवा दहा Unicorns असायचे. तुम्हाला हे ऐकून खूप आनंद झाला असेल की आता Unicorns च्या जगातही भारत वेगाने भरारी घेत आहे. एका अहवाला नुसार याच वर्षी एक मोठा बदल घडून आला आहे. केवळ 10 महिन्यातच देशात दर दहा दिवसात एक युनिकॉर्न तयार झाला, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले. 


भारताच्या विकास गाथेला इथेच वळण मिळालं आहे जिथे आता लोक केवळ नोकरी शोधण्याचे स्वप्न पाहत नाही तर रोजगार देणारे देखील बनत आहेत. यामुळे जागतिक पटलावर भारताची स्थिती आणखी मजबूत होईल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  म्हणाले. 


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  म्हणाले की, आज भारतात 70 हून अधिक Unicorns झाले आहेत. म्हणजे 70 पेक्षा अधिक Start-Up असे आहेत जे 1 अब्जा पेक्षा अधिक मूल्य पार केले आहेत. Start-Upच्या यशामुळे प्रत्येकाचे त्याकडे लक्ष गेलं आणि ज्याप्रकारे देशातून, विदेशातून गुंतवणूक दारांचा त्याला पाठिंबा मिळत आहे. Start-Upsच्या माध्यमातून भारतीय युवा जागतिक समस्येवर तोडगा काढण्यात आपलं योगदान देत आहेत, असं ते म्हणाले. 


Start-Upच्या जगात आज भारत जगात एक प्रकारे नेतृत्व करत आहे. वर्षानुवर्षे Start-Upला विक्रमी गुंतवणूक मिळत आहे. हे क्षेत्र अतिशय वेगाने पुढे जातआहे. इथ पर्यंत की देशातल्या छोट्या-छोट्या शहरातदेखील Start-Upची व्याप्ती वाढली आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले.