एक्स्प्लोर

आई-बाबांना स्मार्टफोन घेऊन द्यायचाय, भारताला जेतेपद मिळवून देणारी महिला खेळाडू भावूक

Hockey : भारताच्या ज्युनिअर महिला हॉकी संघाने आशिया चषकावर नाव कोरत इतिहास रचला

Hockey : भारताच्या ज्युनिअर महिला हॉकी संघाने आशिया चषकावर नाव कोरत इतिहास रचला.  दक्षिण कोरियाचा 2-1 ने पराभव करच टीम इंडियाने चषकावर नाव कोरले.  या स्पर्धेत अन्नू हिने आपल्या कामगिरीने प्रभावित केले. एकापाठोपाठ एक गोल मारत भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. यशाच्या शिखरावर पोहचलेल्या अन्नूचा संघर्ष मोठा आहे. कठीण परिस्थितीला सामोरं जात यशाला गवसणी घातली. आपल्यासाठी उपाशी झोपणाऱ्या आई-वडिलांना ऐतिहासिक सामना पाहायला मिळाला, ही खंत अन्नूच्या मनात राहिली. आशिया चषकावर नाव कोरल्यानंतर आता काय करणार.. असे विचारले असता अन्नूने आपल्या आई-वडिलांना स्मार्टफोन घेऊन देणार असे सांगितले. 

आशिया चषकात भारताच्या ज्युनिअर महिला हॉकी संघाने चमकदार कामगिरी केली. अन्नूने आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले. अन्नूच्या दमदार कामगिरच्या बळावरच भारताने चार वेळच्या विजेत्या दक्षिण कोरियाचा पराभव केला. अंतिम सामन्यात अन्नूने पहिला गोल करत टीम इंडियाच्या खेळाडूंना सकारात्मक उर्जा दिली. अन्नूने या स्पर्धेत सर्वाधिक 9 गोल केले आहेत. दोन वेळा प्लेअर ऑफ द मॅच होण्याचा मानही तिने पटकावलाय. 

हरियाणातील जींद जिल्ह्यातील रोजखेडा या छोट्या गावात अन्नू कुटुंबासोबत राहते. अन्नू म्हणाली की, 'फायनलचा सामना आई-बाबा पाहू शकले नाहीत, हे दु:ख नेहमीच राहिल. त्यांच्याकडे स्मार्टफोन नसल्यामुळे ते लाईव्ह सामना पाहू शकले नाहीत. आता घरी गेल्यानंतर सर्वात आधी स्मार्टफोन घेऊन देणार... जेणेकरुन यापुढे असे होणार नाही. '  आम्ही खूप कठीण दिवस पाहिलेत. बाबा शेतात मजुरी करायचे तर कधी वीटभट्टीवर काम करत होते. आई आजारपणाने खिळली होती. त्यामुळे अनेकदा उपाशीपोटी झोपावे लागले. मैदानावर खेळताना नेहमीच आई-बाबांचा संघर्ष डोळ्यासमोर येत होता, असे अन्नु म्हणाली. 

भारतीय क्रिकेट संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप गमावली, त्याच दिवशी भारताच्या ज्युनिअर महिला हॉकी संघाने आशिया चषकावर नाव कोरले. क्रिकेटपेक्षा इतर खेळाडूंना माध्यमात कमी महत्वं दिले जाते... त्यादिशीह असेच झाले. अन्नु म्हणाली की, भारतात सर्वजण क्रिकेटला पसंत करतात... ज्युनिअर हॉकीला अद्याप तितकी ओळख मिळाली नाही. या सामन्याने एक दिवस का असेना... पण परिस्थिती बदलली. लोकांचे विचार बदलतील, आमच्या कामगिरीचेही कौतुक होईल, अशी आशा आहे. 

दोन लाखांचे बक्षीस - 

 किताब जिंकणाऱ्या संघातील प्रत्येक खेळाडूला रोख दोन लाख रुपये देण्याची घोषणा हॉकी इंडियाने केली. यासोबतच त्यांनी सपोर्ट स्टाफच्या प्रत्येक सदस्याला 1 लाख रुपये देण्याचीही घोषणा केली. भारतीय संघ अजिंक्य राहिला आणि या वर्षी चिली येथे होणाऱ्या ज्युनिअर विश्वचषक 2023मध्येही स्थान मिळवले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा पाय आणखी खोलात?  पोलीस महासंचालकांनी अहवाल मागवला
पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा पाय आणखी खोलात? पोलीस महासंचालकांनी अहवाल मागवला
Emraan Hashmi : चित्रपटात कसा शूट होतो इंटिमेट सीन? 'सीरियल किसर' इम्रान हाश्मीने सांगितली पडद्यामागची गोष्ट...
चित्रपटात कसा शूट होतो इंटिमेट सीन? 'सीरियल किसर' इम्रान हाश्मीने सांगितली पडद्यामागची गोष्ट...
Kolhapur : श्रीक्षेत्र नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा संपन्न; मंदिरात स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी, नेमका काय असतो हा सोहळा?
श्रीक्षेत्र नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा संपन्न; मंदिरात स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी, नेमका काय असतो हा सोहळा?
Astrology : आज रवि योगासह जुळून आले अनेक शुभ योग; 'या' 5 राशींना मिळणार नशिबाची साथ, करिअर गाठणार नवी उंची
आज रवि योगासह जुळून आले अनेक शुभ योग; 'या' 5 राशींना मिळणार नशिबाची साथ, करिअर गाठणार नवी उंची
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pooja Khedkar Certificate :  पूजा खेडकर पूर्णपणे फिट, MBBS ला असतानाचं पूजा खेडकरांचं सर्टिफिकेट समोरGhatkopar Hording Case : दुर्घटना माझ्या कार्यकाळात नाही, खलिद यांच्याकडून अनेक अजब दावेPooja Khedkar Case | पूजा खेडकर मुक्कामी असलेल्या शासकीय वसतिगृहाची पोलिसांकडून साडेतीन तास चौकशीWarkari Bus Accident | पंढरपूरला जाणाऱ्या खाजगी बसचा अपघात, 5 वारकऱ्यांचा मृत्यू, 30 जण जखमी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा पाय आणखी खोलात?  पोलीस महासंचालकांनी अहवाल मागवला
पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा पाय आणखी खोलात? पोलीस महासंचालकांनी अहवाल मागवला
Emraan Hashmi : चित्रपटात कसा शूट होतो इंटिमेट सीन? 'सीरियल किसर' इम्रान हाश्मीने सांगितली पडद्यामागची गोष्ट...
चित्रपटात कसा शूट होतो इंटिमेट सीन? 'सीरियल किसर' इम्रान हाश्मीने सांगितली पडद्यामागची गोष्ट...
Kolhapur : श्रीक्षेत्र नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा संपन्न; मंदिरात स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी, नेमका काय असतो हा सोहळा?
श्रीक्षेत्र नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा संपन्न; मंदिरात स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी, नेमका काय असतो हा सोहळा?
Astrology : आज रवि योगासह जुळून आले अनेक शुभ योग; 'या' 5 राशींना मिळणार नशिबाची साथ, करिअर गाठणार नवी उंची
आज रवि योगासह जुळून आले अनेक शुभ योग; 'या' 5 राशींना मिळणार नशिबाची साथ, करिअर गाठणार नवी उंची
Horoscope Today 16 July 2024 : आज 'या' राशींवर राहणार बाप्पाची कृपा; मार्गातील अडथळे होणार दूर, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींवर राहणार बाप्पाची कृपा; मार्गातील अडथळे होणार दूर, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Ajit Pawar: अजितदादा नवाब मलिकांसोबत स्नेहभोजनात एकाच पंगतीला बसले, मनमोकळ्या गप्पाही मारल्या, आता देवेंद्र फडणवीस काय करणार?
अजितदादा नवाब मलिकांसोबत स्नेहभोजनात एकाच पंगतीला बसले, मनमोकळ्या गप्पाही मारल्या, आता देवेंद्र फडणवीस काय करणार?
Narayan Surve :  कविवर्य नारायण सुर्वे यांच्या शब्दांची पुण्याई कामाला आली, चोराने डल्ला मारलेल्या वस्तू परत दिल्या, भावनिक चिठ्ठी लिहित म्हणाला....
कविवर्य नारायण सुर्वे यांच्या शब्दांची पुण्याई कामाला आली, चोराने डल्ला मारलेल्या वस्तू परत दिल्या, भावनिक चिठ्ठी लिहित म्हणाला....
तू गजाननभक्त म्हणून शेवटचं सांगतोय..., भाजप आमदाराची फोनवरून धमकी; ऑडिओ व्हायरल
तू गजाननभक्त म्हणून शेवटचं सांगतोय..., भाजप आमदाराची फोनवरून धमकी; ऑडिओ व्हायरल
Embed widget