एक्स्प्लोर
रिओ ऑलिम्पिकचा दिमाखदार उद्घाटन सोहळा

1/33

2/33

फर्नाडो मेइरेलेस यांनी पत्रकारांना दिलेल्या प्रतिक्रीयेत, मनाने एखादे काम केले, तर खर्च आपोआपच कमी होतो असे म्हटले होते. रिओ ऑलिम्पिकचे बजेट हे लंडन आणि बिजिंग ऑलिम्पिकपेक्षा कमी असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
3/33

4/33

ब्राझीलच्य दलाने स्टेडिअममध्ये प्रवेश करताच, टाळ्यांच्या कडकडाट स्वागत करण्यात आले. यानंतर पोर्तुगाल, ब्रिटेन, फ्रांस, मॅक्सिको आणि इटलीच्या नगरिकांनीही उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.
5/33

या सोहळ्यासाठी अधुनिक तंत्रज्ञानाचा सर्वाधिक वापर केल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.
6/33

7/33

बजेटच्या कमतरतेमुळे अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कमी करण्यात येईल हे यापूर्वी स्पष्ट करण्यात आले होते.
8/33

मात्र बजेटच्या अनुरुपच या सोहळ्याला अधिकच भव्य दिव्य करण्याचा प्रयत्न आयोजकांकडून करण्यात आला.
9/33

10/33

डोपिंग प्रकरणामुळे अडचणीचा सामना करावा लागणाऱ्या रिओ ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवलेल्या रशियाच्या दलाचेही स्वागत करण्यात आले. तर निर्वासितांच्या दलाचेही ऑलिम्पिकमध्ये टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
11/33

गिजेल यांनी आपल्या करिअरची या कॅटवॉकने सांगता केली. त्यांनी अनेक प्रसिद्ध ब्रॉण्डना लाँच केले होते. आजही त्या अनेक ब्रॉण्डची ओळख आहेत, त्यांचा चेहरा अनेक मासिकांच्या कव्हरपेजवर असतो.
12/33

यानंतर दिवंगत गायक, संगीतकार टोम जोबिम यांचे द गर्ल फ्रॉम इपानेमा हे गीत त्यांचे नातू डॅनियल यांनी सादर केले. या गीताच्या सादरीकरणावेळी गिजेल बुंडचेन या सुपरमॉडेलने कॅटवॉक करून प्रेक्षकांचे लक्ष वेधले. बुंडचेन यांचा त्यांच्या करिअरमधील शेवटचा कॅटवॉक होता.
13/33

14/33

प्रत्येक देशाच्या राष्ट्रध्वजासोबत एक मुलगा आणि मुलगी होती. त्यांच्या हातात झाडाचे रोप देण्यात आले होते.
15/33

यावेळी ऑलिम्पिक खेळांसाठी सीरिया, दक्षिण सुदान, इथोपिया आणि कांगोचे १० सदस्य निर्वासितांच्या संघात सहभागी होत आहेत. त्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले.
16/33

या सोहळ्यात भारतीय दलाचे नेतृत्व दिग्गज नेमबाज अभिनव बिंद्राने केले. सोहळ्याच्या सुरुवातीला भारतीय लोकाचाराला सन्मान देण्यासाठी प्रस्तुतकर्त्यांनी ओमचे उच्चारण केले.
17/33

18/33

या उद्घाटन सोहळ्याच्या शेवटच्या टप्प्यात २०७ देशांचा परेड ऑफ नेशन्स करण्यात आले. यावेळी ऑलिम्पिक समितीमध्ये सहभागी होणाऱ्या कोसोवो आणि दक्षिण सुदान आदींनाही प्रतिनिधित्व दिले होते.
19/33

या सर्व खेळाडूंनी आपल्या राष्ट्रीय पोषाखात परेडमध्ये सहभाग घेतला. त्यांच्या पुढे तीन चाकी सायकल चालवण्यात येत होती. यावर पृथ्वीला वाचवण्याचा संदेश देणारा फलक लावला होता.
20/33

मारकाना स्टेडिअमवर करण्यात येणाऱ्या फटाक्यांच्या अतिषबाजीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. तसेच मंचावर अनेक नृत्यप्रकार आणि संगीत सादर केले. यामध्ये देशातील गरजूंना प्रतिनिधित्व देण्यात आले होते.
21/33

या सोहळ्यावेळी ब्राझीलच्या राष्ट्र उभारणीवरील कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये युरोपीय आणि आफ्रिकी नागरिकांमध्ये झालेल्या वादाचाही समावेश होता.
22/33

ब्राझीलमध्ये वेळेनुसार, शुक्रवारी रात्री ८ वाजता (भारतीय वेळेनुसार, शनिवारी पहाटे ४.३०वा.) या सोहळ्याची सुरुवात झाली. हा कार्यक्रम जवळपास साडे तीन तास सुरु होता.
23/33

रिओ डी जेनेरियो: ''रिओ इतिहास रचण्याच्या तयारीत आहे'' असे वक्तव्य रिओ ऑलिम्पिक आयोजन समितीचे अध्यक्ष कार्लोस नुजमान यांनी शुक्रवारी ३१ व्या ऑलिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळ्यादरम्यान केले. शुक्रवारी रिओ ऑलिम्पिकचे दिमाखदार सोहळ्याने सुरुवात झाली.
24/33

मारकाना स्टेडिअममध्ये बनवण्यात आलेल्या व्यासपीठावर अनेक कलाकारांनी नृत्य सादर करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. या नृत्य प्रकारांमध्ये पर्यावरणावर रस्ते, शहरीकरण, कृषी आणि खाणीचा कसा ऱ्हास होतो आहे हे सांगण्यात आले.
25/33

बाख या विषयावर म्हणाले की, बाझीलने इतिहासातील सर्वात कठीण प्रसंगातही आपल्या वस्तू सांभाळून ठेवल्या आहेत.
26/33

राष्ट्राध्यक्ष डिल्मा रोसेफ यांना त्यांच्या खात्यातील घोटाळ्यामुळे प्रतिनिधिंनी त्याच्याविरोधात महाभियोग चालवून निलंबित केले होते.
27/33

सोहळ्याच्या सुरुवातीला टेमर यांची ओळख करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र, तशी ती करून देण्यात आली नाही. पण अशाप्रकारच्या पारंपरिक सोहळ्यावेळी सरकारच्या प्रमुख व्यक्तीची ओळख करून दिली जाते.
28/33

ऑलिम्पिकचा उद्देश जगतिक शांततेला प्रोस्ताहन देणे आहे. खेळांच्या विस्तारात ग्रहांना नुकसान पोहचवणे नसून त्या नुकसानीवर उपाय शोधणे आहे.
29/33

यापूर्वी ब्राझीलच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष मिशेल टेमर यांनी मारकाना स्टेडिअममध्ये हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत ३१ व्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटनाची औपचारीक घोषणा केली.
30/33

या सोहळ्याच्या सांगतेवळी फटाक्यांची आतिषबाजीने सर्वांचीच मने जिंकली. या खेळांच्या सुरुवातीला ब्राझीलचे राजकीय संकटासोबतच नियोजनातील ढिसाळपणा आदीचे संकट होते. मात्र तरीही, उद्घाटन सोहळ्यावेळी ब्राझीलच्या नागरिकांमध्ये ऑलम्पिक स्पर्धेच्या नियोजनात कोणतीही कसूर न सोडण्याचा निर्धार जाणवत होता.
31/33

ऑलिम्पिकच्या इतिहासात प्रथमच निर्वासितांचा संघ अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती(IOC)च्या झेंड्याखाली सहभागी होत आहे. या संघाचे स्वागत करताना IOCचे प्रमुख थॉमस बाख म्हणाले की, ''आम्ही आमच्या समाजाच्या एकतेसाठी विविधतेचे स्वागत करतो.''
32/33

केन्या ऑलिम्पिक समिती(KOC)चे अध्यक्ष आणि दिग्गज ट्रॅक अॅन्ड फिल्ड अॅथलिट केपचोगे केइनो यांना यावर्षीचा 'ऑलिम्पिक लॉरेल' पुरस्काराने गौरवण्यात आले.
33/33

ऑलिम्पिक खेळांची सुरुवात जगाला ग्लोबल वॉर्मिंगपासून वाचवण्याचा संदेश देऊन करण्यात आली. या वर्षीची स्पर्धेची थिम जगाला पुन्हा सुजलाम सुफलाम बनवणे, तसेच वृक्ष तोड थांबवणे आहे.
Published at : 06 Aug 2016 07:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
