एक्स्प्लोर
जो रुट इंग्लंडचं कर्णधारपद भूषवण्यास सक्षम : अॅलिस्टर कूक

मुंबई : भारताविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर, इंग्लंडच्या अलिस्टर कूकच्या कर्णधारपदाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यातच जो रुट हा कर्णधारपदाची धुरा सांभाळण्यासाठी सक्षम आहे, असं म्हणत कर्णधार अॅलिस्टर कूकनेही तसे संकेत दिले आहेत. टीम इंडियाने मुंबईतील चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा एक डाव आणि 36 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह भारताने मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली. इंग्लंडचा हा यंदाच्या वर्षातील सहावा पराभव आहे. त्यामुळे कर्णधार कूकच्या नेतृत्त्वाबाबत प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. त्याबाबत कूक म्हणाला, " इंग्लंडचा मधल्या फळीतील हुकमी फलंदाज ज्यो रुट कर्णधारपद सांभाळण्यासाठी तयार आहे. भारताकडून झालेल्या पराभवामुळे माझ्या कर्णधारपदाबाबत प्रश्न उपस्थित होणं साहजिक आहे. मात्र मी पुढील वर्षापर्यंत माझ्या भविष्याबाबत कोणताही निर्णय घेऊ शकणार नाही" "जो रुट इँग्लंडचं कर्णधारपद भुषवण्यास तयार आहे. त्यामुळे तो कर्णधार झाल्यावरच त्याला इंग्लंडच्या कर्णधारपदाचा काय अनुभव येतो ते पाहाव लागेल. एकदा खोल पाण्यात फेकलं की बुडायचं की पोहत वर यायचं, एवढं ते सोप्प आहे," असं कूक म्हणाला. "तसंच यासाठी तुम्हाला कुणीही तयार करु शकत नाही. जो रुटला कर्णधारपदाचा पुरेसा अनुभव मिळालेला नाही, मात्र त्याचा अर्थ तो नेतृत्व करु शकत नाही असा होत नाही," असंही कूकनं सांगितलं.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण























